अकोला महाबीज संचालकपदाची निवडणुक,डॉ. रणजित सपकाळ व वल्लभराव देशमुख यांची अविरोध निवड.
अकोला महाबीज संचालकपदाची निवडणुक,डॉ. रणजित सपकाळ व वल्लभराव देशमुख यांची अविरोध निवड.
अकोला महाबीज संचालकपदाची निवडणुक,डॉ. रणजित सपकाळ व वल्लभराव देशमुख यांची अविरोध निवड.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ चे भागधारकांची संख्या मोठी आहे या निवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ‘महाबीज’ दोन संचालक पदासाठीचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये अकोला (विदर्भ) मतदारसंघातून डॉ. रणजित सपकाळ यांचे विरोधात अर्ज न आल्याने अविरोध निवड झालीय तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव तेजराव देशमुख यांची सुद्धा अविरोध निवड झाली. उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेत इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची अविरोध निवड झाली आहे.

महाबीजच्या दोन संचालकांच्या निवडीसाठी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरु होती. या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात अविरोध निवड झालीय.
विदर्भ मतदार संघातून अकोला येथील भाजपचे माजी खासदार संजय धोत्रे यांचे निकवर्तीय डॉ. रणजित सपकाळ तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख यांची अविरोध निवड झालीय.डॉ रणजित सपकाळ हे अकोला येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व आहेत तर देशमुख हे बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील रहिवासी आहे.
