आपला जिल्हा अकोलाधार्मिक

वसंत उत्सवाच्या सुरूवातीला वसंताचे सहस्र चंद्र दर्शन मोठा योग,वसंतराव पाटील मुरूमकर यांच्या त्याग आणि कर्तृत्वाच्या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याला संतांचा मेळावा परमार्थी योग – भागवताचार्य गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. 

प्रपंच व परमार्थ साधून वसंतरावांनी कौटुंबिक जबाबदारी लिलया पेलली - गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर

वसंत उत्सवाच्या सुरूवातीला वसंताचे सहस्र चंद्र दर्शन मोठा योग,वसंतराव पाटील मुरूमकर यांच्या त्याग आणि कर्तृत्वाच्या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याला संतांचा मेळावा परमार्थी योग – भागवताचार्य गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. प्रपंच व परमार्थ साधून वसंतरावांनी कौटुंबिक जबाबदारी लिलया पेलली – गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर

अकोला दि. – शिवर गावचे शिल्पकार सहकार नेते जगदीश पाटील मुरूमकर परिवार यांनी आयोजित केलेल्या वसंतराव अवधूतराव पाटील मुरूमकर यांच्या 81वा जन्मदिन सहस्र चंद्र दर्शन सोहळा 2 मार्चला वारकरी संप्रदाय व दत्त संप्रदायातील महंतांच्या मेळात व आप्तेष्ट, स्नेही,ग्रामस्थ, मित्र परिजनाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व धार्मिक विधीत संपन्न झाला.

अकोला शिवर येथील मुरूमकर पाटील कुटुंब एकत्रित कुटुंब वासुदेवंम कुटुंबीय पद्धतीचे पिढ्यानपिढ्या दत्त संप्रदायातील आनंदमार्गस्त रावजी पाटील मुरूमकर यांच्या नंतर अवधूतराव पाटील मुरूमकर यांनी दत्त सोळस पुजा मार्ग कायम चालवली तोच वारसा नंतर मुले वसंतराव पाटील मुरूमकर, जगदिशराव पाटील मुरूमकर, मुली बेबीताई महल्ले कळबेश्वर,प्रमीलाताई कराळे सागद,निर्मलाताई बिहाडे वरूड बिहाडे, सुशिलाताई टाले दिग्रस यांनी सुरू ठेवला आज वसंतराव अवधूतराव पाटील मुरूमकर यांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा केला त्या निमित्ताने संत मेळ वारकरी संप्रदाय व दत्त संप्रदायातील संत महंतांची उपस्थित विशेषतः महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य गुरुवर्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ, गुरुवर्य संत गोपाळ महाराज उरळकर, शिखर माहूर संस्थान चे महंत वासुदेव भारती महाराज,माहूर पिठ मोहनराज भारती, यवतमाळ झटाळा संस्थान चे शहापूरी महाराज,आनंद पूरी गुरू मानपूरी, संत सखारामपूर संस्थान चे प्रतिनिधी हभप मोतीराम महाराज कळबेश्वरकर व्यासपीठावर उपस्थिती लक्षणीय होती. 

सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याचे पुर्व संधेला सोळस पूजाविधी शिखर माहूर संस्थान चे महंत वासुदेव भारती महाराज,माहूर पिठ मोहनराज भारती, यवतमाळ झटाळा संस्थान चे शहापूरी महाराज,आनंद पूरी गुरू मानपूरी यांच्या पौरोहित्यात व दत्त मार्गस्थ मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यानंतर 2 मार्चला सकाळी 11 वाजता सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी संत मंहताच्या हस्ते श्री दत्तात्रय प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सहस्र चंद्र दर्शन मुर्ती वसंतराव पाटील मुरूमकर यांचा मोठा गुलाबपुष्प हार, शेला श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवर उपस्थित मंहताचे स्वागत करण्यात आले. मुरुमकर परिवारातील युवा पिढी ने वसंतराव मुरूमकर यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतन निमित्ताने सुंदर असा केक यावेळी कापण्यात आला. 

जगदीश पाटील मुरूमकर यांच्या प्रास्ताविकाने सुरूवात झाली त्यानंतर श्री ज्ञानेश संस्थान वारी भैरवगड चे भागवताचार्य गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याचा उद्देश व असा सोहळा कोणाच्या नशीबात असतो याबद्दल विविध दृष्टांत देवून सहस्र चंद्र दर्शन सोहळा महत्त्व विषद केले तसेच  वसंतराव मुरूमकर यांच्या परमार्थाचे कौतुक करताना वसंत उत्सवाच्या सुरूवातीला वसंताचे सहस्र चंद्र दर्शन मोठा योग आहे वसंतराव पाटील मुरूमकर यांच्या त्याग आणि कर्तृत्वाच्या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याला संतांचा मेळावा परमार्थी योग असल्याचे सांगून असे कौटुंबिक सोहळे काळाची गरज असल्याचे सांगितले त्यानंतर गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर यांनी सुद्धा वसंतराव पाटील मुरूमकर यांनी प्रपंच व परमार्थ साधून कौटुंबिक जबाबदारी लिलया पेलली असल्याचे सांगून आज कुटुंब वत्सला पद्धतीचे मुरूमकर कुटुंब एक उत्तम दाखला देता येईल असे या प्रसंगी सांगितले तसेच यावेळी शहापूरी महाराज, अतुल पाटील अमानकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

आपल्या सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा केला जात आहे हि सर्व माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे आजोबा रावजी पाटील मुरूमकर, वडील अवधूतराव मुरूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गस्थ राहून कार्य करीत राहिलो त्यांनी दिलेले श्री दत्तात्रय यांचे नाम पुढे सुरू केले. श्री दत्त कृपेने समाजात, नोकरीत अडचणी तून मार्ग निघाले ते श्री दत्तात्रय नामस्मरणाने असे आपल्या सत्कार प्रसंगी वसंतराव पाटील मुरूमकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जगदीशराव पाटील मुरूमकर यांनी तर सुत्रसंचालन गणेश मुरूमकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने संपन्न झाली. यावेळी शिवर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील श्री दत्तात्रय मार्गस्थ मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, स्नेही, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!