ब्रह्माकुमारीज् मीडिया विंगतर्फे जिल्हास्तरीय आयोजित संमेलनात पत्रकारितेतील बदलते तंत्रज्ञान, संधी, आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता विषयावर मंथन.
डिजिटल पत्रकारितेत तंत्रज्ञानाचे विवेकी अन् प्रभावी उपयोगी संतुलन आवश्यक !
ब्रह्माकुमारीज् मीडिया विंगतर्फे जिल्हास्तरीय आयोजित संमेलनात पत्रकारितेतील बदलते तंत्रज्ञान, संधी, आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता विषयावर मंथन.
डिजिटल पत्रकारितेत तंत्रज्ञानाचे विवेकी अन् प्रभावी उपयोगी संतुलन आवश्यक !

अकोला : डिजिटल पत्रकारिता करताना तंत्रज्ञानात होत असलेली स्थित्यंतरे अपरिहार्य असून बदलत्या प्रवाहात तंत्रज्ञानाचा विवेक आणि प्रभावी उपयोग केल्यास शाश्वत मूल्यांना धरुन पत्रकारिता केली जाऊ शकते, असा आशावाद ब्रह्माकुमारीज् मीडिया विंग, अकोला आयोजित जिल्हास्तर मीडिया संमेलनातील वक्त्यांनी व्यक्त केला.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे अकोला सेवा केंद्र आणि माऊंट आबू येथील मीडिया प्रभागामार्फत ‘पत्रकारितेतील बदलते तंत्रज्ञान संधी, आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता’ या विषयावर शुक्रवारी मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अकोला सेवा केंद्राच्या राजयोग शिक्षीका ब्रह्मकुमारी अर्चनादीदी यांनी स्वागतपर भाषण केले.
यावेळी मिडीया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक बीके डॉ. शांतनूभाई, माऊंट आबू यांनी म्हटले की, जगात सर्व क्षेत्रात नैतीक मूल्यामध्ये होत असलेली घसरण पाहता ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी भरीव कार्य केले आहे. चुकीच्या बातम्या क्षणात सर्वदूर पसरतात मात्र सकारात्मक बातम्या लोकांपर्यंत पोहचत नाही, याबद्दल चिंता व्यक्त करतांना त्यांनी सायबर युगातील पत्रकारितेची जबाबदारी वाढल्याचे स्पष्ट केले.

राज्य समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी नवीन तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. रामप्रकश वर्मा यांनी कलम आणि मशाल यांची तुलना पत्रकारितेसंदर्भात केली तर देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांनी त्याग, सेवा आणि समर्पण या मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या त्रिसूत्री सांगितल्या. आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी सुरज गोळे, यांनी आकशवाणीद्वारे होत असलेल्या मूल्यनिष्ठ कार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ. हमेश नानवाला, यांनी तंत्रज्ञान जरी विकसीत झाले तरी प्रिंट पत्रकारितेला पर्याय नसल्याचे म्हटले, श्याम शर्मा, डॉ. प्रमोद शुक्ल, यांनी सुद्धा विचार व्यक्त केले.
अकोला सेवा केंद्र संचालिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदी यांनी माऊंट आबू येथे मीडिया विंग मार्फत होण्याऱ्या संमेलनासाठी निमंत्रण देऊन आशीर्वचन दिले. तर राजयोग अभ्यास बी. के. वर्षादीदी यांनी उपस्थितांना करवून दिला. कार्यक्रमाचे संचालन ब्रह्माकुमारी वर्षादीदी तर आभार प्रदर्शन बीके ज्ञानज्योती अॅड. सारिका तिवारी यांनी केले.
सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे म्हणजे मुल्यनिष्ठ पत्रकारिता-प्रकाश पोहरे
दैनिक देशोन्नतीचे मुख्यसंपादक प्रकाश पोहरे यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेची ओळख करून देताना स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेमध्ये होत असलेल्या बदलांचा आढावा घेतांना म्हटले की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणे म्हणजे मूल्यनिष्ठ पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नष्ठ पत्रक करणे होय, असे सांगत बदलत्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधी त्यामुळे आलेली आव्हाने आणि मूल्यनिष्ठ पत्रकारीते संदर्भातील विविध पैलू त्यांनी उपस्थित केले.