आपला जिल्हा अकोला

शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.,प्राचार्य संतोष साळुंके 

शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.,प्राचार्य संतोष साळुंके 

शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.,प्राचार्य संतोष साळुंके

अकोला, दि. ३ : सम्राट चंद्रगुप्त मौर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) येथे प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

 अतिशय कमी खर्चात अनेक दशकांपासून कौशल्य प्रदान करून रोजगार आणि स्वयंरोजगार अत्यंत यशस्वी अशी शासकीय योजना असलेल्या आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून प्रवेश अर्ज दाखल करणे आणि व्यवसाय निवड याबाबतची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.

आयटीआय येथे अभियांत्रिकी तथा बिगर अभियांत्रिकी व्यवसायांना बहुसंख्य मुला-मुलींनी नाना विविध व्यवसायांना प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य आयटीआय अकोला संतोष साळुंके यांनी केले आहे.

या वर्षी प्रवेश उत्सुक उमेदवार याला आधार कार्ड वरील नोंदी नुसार admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरून तो आयटीयआय येथे आवश्यक ती कागदपत्रे दाखवून अर्ज निश्चित करावा, असे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख अरविंद पोहरकर यांनी सांगितले.

या वर्षी संस्थेत अल्पसंख्यांक प्रवर्गातील उमेदवारांकरिता खास राखीव असलेल्या ६ व्यवसायांना तसेच इतर २२ सार्वत्रिक अभियांत्रिकी तसेच बिगर अभियांत्रिकी व्यवसायांच्या एकूण ८८८ या वर्षी प्रवेश दिल्या जाणार आहेत. विविध कौशल्य देणाऱ्या व्यवसाया बाबत सविस्तर माहिती पत्रक संस्थेत उपलब्ध असल्याचे प्रवेशप्रमुख विनोद पायघन यांनी सांगितले.

 अधिक माहिती करता संस्थेमध्ये दररोज सकाळी १०ते ११ या कालावधीमध्ये मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विविध व्यवसायांची आणि त्यांची माहिती त्या माध्यमातून इच्छुक उमेदवार यांना दिले जाते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!