श्री. संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव ७५० राज्यभर साजरा करा.
महाराष्ट्र शासनाचे सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव ७५० राज्यभर साजरा करा.
महाराष्ट्र शासनाचे सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष म्हणून साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या “गोकुळ अष्टमी”, दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेवांची ७५० वी जयंती महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, नगर व शहरांमध्ये साजरी करावयाची आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती मध्ये संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा/मुर्तीची पालखीतून मिरवणूक सायंकाळी ५ ते ७ या वेळेत काढून हा उत्सव साजरा करण्यात यावा. तसेच याची सुयोग्य अंमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी, तसे निर्देश जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना देण्यात यावेत असे विनोद बोंदरे उप सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्राद्वारे सुचविले आहे.