श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे बालसंस्कार शिबिराची समारोपाकडे वाटचाल.
श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे बालसंस्कार शिबिराची समारोपाकडे वाटचाल.
श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे बालसंस्कार शिबिराची समारोपाकडे वाटचाल.

संतश्री वासुदेवजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गत विस वर्षापासून सानंद संपन्न होणाऱ्या श्री माऊली सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराची समारोपाकडे वाटचाल होत असून, पुरुषोत्तम मास , भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा सुवर्ण महोत्सव तथा गुरुपुष्यामृतयोग अशा त्रिवेणी संगमावर २१ तारखेला पहाटे श्रीगुरु महाराजांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सर्व आजी माजी विद्यार्थी , प्रबोधनकार महाराज मंडळी व महंत स्वामी कृष्णानंद भारतीजी महाराज यांच्या उपस्थितीत व श्रीयुत प्रा. श्रीकांत महाराज भुस्कटे यांच्या पौरोहित्यात अवभृतस्नान , मिष्ठान्न , पंचधान्य व नाणेतुला आदिंचा विधीयुक्त कार्यक्रम संपन्न होऊन ,सायंकाळी सहा ते दहा या वेळेत स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ धंतोली नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रात्यक्षिकास गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रोत्साहनपर बक्षीस वितरणाचा भव्य आणि दिव्य नेत्र दीपक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तत्पूर्वी दि. १७ मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी सह संत चतुष्टयांच्या गाथा तसेच संतश्री वासुदेवजी महाराज लिखित गजानन महाराज संपूर्ण चरित्र आदि ग्रंथांचे सामूहिक पारायण, विष्णुसहस्त्रनाम, गोपी गीत, भ्रमर गीत , हनुमान चालीसेचे पठाण असा भरगच्च कार्यक्रम संपन्न होत आहेत.

दि. २० ला श्री ज्ञानेश आश्रम ते श्रीक्षेत्र वारी हनुमान येथे बाल वैष्णवांच्या पायी दिंडी सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. दिल. १९ व २० मे ला दिवसभर शिबिरार्थी बाल प्रबोधनकारांचे चक्रीप्रवचन व कीर्तनांचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत .असे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.