आपला जिल्हा

बेलखेड येथे 24-25 मार्चला भव्य शंकरपट. लाखोंच्या बक्षिसांची लयलूट.

जय्यत तयारी सुरु.

बेलखेड येथे 24-25 मार्चला भव्य शंकरपट.
लाखोंच्या बक्षिसांची लयलूट.
जय्यत तयारी सुरु.

बेलखेड – अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे भव्य शंकरपट आयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ व समस्त गावकरी यांच्या वतीने आराध्यदैवत मोठा मारोती यांच्या कृपाशीर्वादाने दि. 24-25 मार्चला आयोजित केले आहे. शंकरपट मध्ये लाखों रूपयांच्या बक्षिसांची लयलूट ठेवली आहे. तरी शंकरपट प्रेमी व नामांकित बैल धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलखेड ग्रामस्थ आयोजकांनी केले आहे.

बेलखेड येथील स्व. लीलाबाई मनोहरराव टोहरे यांच्या शेतात दि. 24-25 मार्चला आयोजित शंकरपटाचे उद्घाटन जिल्ह्याचे युवा खासदार अनुप धोत्रे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रमुख अतिथीत तसेच मतदारसंघ आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हि शंकरपट स्पर्धा अ व क गटात होणार असून या साठी वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस राहणार आहेत. अ गटात 51 हजार पासून ते 2 हजार पर्यंत बारा बक्षिसे उतरत्या क्रमाने राहणार आहेत तसेच क गटात सुद्धा 21 हजार पासून ते 1 हजार पर्यंत उतरत्या क्रमाने एकुण 15 बक्षीसाची लयलूट होणार आहे. स्पर्धेत बैल जोडी प्रवेश फी अ गट दोन हजार व क गट एक हजार राहील तरी शंकरपट प्रेमी व पट बैल धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान मंडळ व समस ग्रामस्थ शेतकरी बेलखेड यांनी केले आहे. शंकरपट स्पर्धा विविध शासनाच्या नियम व अटींच्या अधिनस्त राहतील त्यामुळे शंकरपट प्रेमी पट बैल धारकांनी खबरदारी घ्यावी. या शंकरपट मध्ये घड्याळ मालक उल्हासराव दाभाडे काम पाहतील.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!