आपला जिल्हा

नीतिमानतेची मुहूर्तमेढ बालपणातच व्हावी लागते. ज्ञानेश्वर महाराज भालतिलक

संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ

नीतिमानतेची मुहूर्तमेढ बालपणातच व्हावी लागते.
ज्ञानेश्वर महाराज भालतिलक

विज्ञानाने प्रत्येक गोष्टीची गती वाढविली असल्यामुळे परिणामी प्रत्येकाची प्रतीक्षा करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. आज लहान बालकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आल्यामुळे त्याच्या पटलावरील आभाशीचित्र जसे क्षणातच बदलते अगदी त्या प्रमाणे आपल्या जीवनातील वास्तविक चित्र सुद्धा बदलले पाहिजे अशी त्याला वाटत असते. प्रत्यक्ष तसे न घडल्यामुळे तो चिडचिडा होऊन टोकाची भूमिका घेताना दिसतो . म्हणून गतिमान युगाला नीतिमानतेची जोड असणे आवश्यक असून; त्या नीतिमानतेची मुहूर्तमेढ बालपणातच व्हावी लागते असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी मांडले .
ते आज संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनात आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की , पौराणिक कथा ऐतिहासिक विषयाचे ज्ञान अनैतिक विषयाची चव बालकाच्या जिभेला लागून तो स्वैराचारी होण्याआधीच त्याला नैतिक व अनैतिकतेतील अंतर उदाहरणासहित पटवून दिल्या गेले पाहिजे जेणेकरून तो चुकीच्या गोष्टी पासून स्वतःहूनच दूर राहील. असे अनेक दाखले देऊ त्यांनी बाल सुलभ भाषेमध्ये बालकांना पौराणिक तथा ऐतिहासिक विषयाचे ज्ञान करून दिले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!