आपला जिल्हा

राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे ,यंदा ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्युला हरविण्याचे उपाय करा’ असे घोषवाक्य निश्चित.

डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे आवाहन.

राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे ,यंदा ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्युला हरविण्याचे उपाय करा’ असे घोषवाक्य निश्चित.
डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे आवाहन.

अकोला, दि. १५ : राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे रोजी असून, यंदा ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्युला हरविण्याचे उपाय करा’ असे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी घरगुती पाण्याचे साठे आठवड्यात किमान एकदा पूर्णपणे स्वच्छ करून नियमित झाकून ठेवावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार यांनी केले आहे.

स्वच्छ पाण्यात अंडी घालणारा एडिस इजिप्टाय हा डास डेंग्यू पसरवतो. सर्व पाण्याच्या साठ्याला, भांड्यांना झाकण व कापड बांधून ठेवल्यास डास अंडी घालणार नाही. आठवड्यातून एक दिवस सर्व भांडी रिकामी करून धुवून पुसून पुन्हा भरल्यास डासाचे जीवनचक्र पूर्ण होणार नाही व उत्पत्तीला आळा बसेल.

लक्षणे : तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, ब-याचवेळा उलट्याही होतात. लक्षणे दिसताच जवळचा दवाखाना गाठावा.

उपाययोजना : आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे, बुजविणे, घराच्या खिडक्यांना डासप्रतिबंधक जाळ्या बसविणे, पाण्याच्या टाक्यांना घट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरातील पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांनी योग्य विल्हेवाट लावून पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, झोपताना मच्छरदाणी वापरणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे.

नागरिकांनी डेंग्यू निर्मूलनासाठीच्या उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, सहायक संचालक डॉ. राधा जोगी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा हिवताप अधिकारी अतुल शंकरवार यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!