आपला जिल्हा

टरबूज व खरबूज पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी… सुभाष रौदळे माजी उपाध्यक्ष जि.प.अकोला

तेल्हारा तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले निवेदन.

टरबूज व खरबूज पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी…
सुभाष रौदळे माजी उपाध्यक्ष जि.प.अकोला

तेल्हारा तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले निवेदन.

तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे सन 2025 मध्ये टरबूज व खरबूज पिक पेरा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता परंतु विशिष्ट व्हायरस मुळे शेतातील संपूर्ण वेल सुकून गेलेले आहेत सदर पिकाला हेक्टरी अडीच लाख रुपये खर्च झाला असून त्या खर्चा एवढी रक्कम सुद्धा वसूल होताना दिसत नाही. बहुतांश ठिकाणी खरबूज व टरबूज पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे व शेतकरी आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या हवालदिल झालेला आहे.


सदर बाब गंभीर असल्याने तहसीलदार साहेब तेल्हारा व कृषी अधिकारी तेल्हारा यांनी तातडीने पंचनामे करण्याचे सुचवावे व सर्व तेल्हारा तालुक्यातील टरबूज व खरबूज पिक उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी पाठपुरावा करावा. टरबूज व खरबूज या पिकाला पीक विम्याचे संरक्षण सुद्धा देण्यात यावे तसेच हवालदिल टरबूज व खरबूज उत्पादक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी. करिता दानापूर शेतकरी माजी जि.प.उपाध्यक्ष सुभाष रौंदळे,हिंगणी येथील पुरस्कार प्राप्त शेतकरी सचिन कोरडे, पंढरीनाथ कोरडे, हिवरखेड चे राजेश वानखडे,श्रीपत विखे, मनीषा रौंदळे, श्रीराम रौंदळे, गोविंद गांधी,तेल्हारा तालुक्यातील दानापूर,हिंगणी, सौंदळा, कारला,वारखेड, वारी, तळेगाव, हिंगणी-बेलखेड शिवार इत्यादी गावातील शेतकरी यांनी निवेदन दिले.

मी माझ्या शेतामध्ये दोन हेक्टर टरबूज पेरले होते टरबूज पिकांची जात विजय विराट व सागर किंग सिंबा व 22 झिरो आठ ह्या बियांची लागवड केली होती मला हेक्टरी दोन लाख रुपये खर्च आलेला आहे तसेच या टरबूज पिकावर गमी वेल्डिंग या नावाचा व्हायरस येऊन पूर्णपणे वेल सुकलेले आहेत तरी शासनाने आम्हाला विमा कवच व आर्थिक उपलब्ध करून देण्यात यावी याकरता आम्ही तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन दिले त्यांनी पाठपुरावा करून मदतीचा अहवाल पाठवावा….
सुभाष रौदळे
माजी.उपाध्यक्ष जि.प.अकोला

मी शेती पिक पेरणी योग्य मशागत करून योग्य वेळेवर, प्रमाणीत बियाणे वापरून पेरणी केली, पाणी नियोजन, किड व रोग फवारणी व अंतर्गत मशागत केली तरी सुद्धा आलेल्या व्हायरस मुळे पिक हातचे गेले परिसरात बहुतांश शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.
सचिन कोरडे, हिंगणी
राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!