अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला. तेल्हारा येथे निषेध.
तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन.
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला.
तेल्हारा येथे निषेध.
तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन.

तेल्हारा (प्रतिनिधी):
अकोला येथील क्राईम रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदवून गुन्हेगारांना त्वरित अटक करून कारवाई ची मागणी तहसीलदार तेल्हारा व ठाणेदार तेल्हारा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनानुसार आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोरात कठोर शासन व्हावे, जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढणे गंभीर बाब आहे.विठ्ठलराव महल्ले यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे. अन्यथा, तालुक्यातील पत्रकार आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रल्हादराव ठोकणे, सुरेश शिंगणारे, सत्यशील सावरकर, सदानंद खारोडे,प्रा.विद्याधर खुमकर, सुरेश सिसोदिया, शुभम सोनटक्के, राहूल मिटकरी, प्रा. कृष्णा फंदाट, पुरूषोत्तम इंगोले, निलेश जवकार, विशाल नांदोकार, अनिल जोशी, धर्मेश चौधरी, रामभाऊ फाटकर, अनिल अवताडे, सागर खराटे, अमित काकड, संदिप सोळंके, प्रशांत विखे, विजय घोडे, आनंद बोदडे, रवि शर्मा, अनंतराव अहेरकर उपस्थित होते.