अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यकारिणी जाहीर. बेलखेड चे विक्की पाटील तालुका उपाध्यक्ष, हेमंत पाटील तेल्हारा शहर अध्यक्ष.
अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यकारिणी जाहीर. बेलखेड चे विक्की पाटील तालुका उपाध्यक्ष, हेमंत पाटील तेल्हारा शहर अध्यक्ष.
अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यकारिणी जाहीर.
बेलखेड चे विक्की पाटील तालुका उपाध्यक्ष, हेमंत पाटील तेल्हारा शहर अध्यक्ष.

अखिल भारतीय मराठा महासंघ तेल्हारा तालुक्याची कार्यकारणी तेल्हारा तालुका अध्यक्ष रविंद्र ढाकरे यांनी जाहीर केली त्यामध्ये तेल्हारा तालुका उपाध्यक्ष पदी बेलखेड चे मराठा समाजाचे युवा नेतृत्व पवन उर्फ विक्की पाटील खुमकर यांची, तेल्हारा शहर अध्यक्ष हेमंत पाटील अवचार निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारणी मध्ये तालुक्यातील विविध गावातील मराठा युवकांचा समावेश आहे.
मराठा नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, डाॅ तेजराव पाटील नराजे, तालुका अध्यक्ष रविन्द्र ढाकरे, युवक तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील कडु , कार्याध्यक्ष विजय देशमुख,युवक उपजिल्हा प्रमुख चेतन नराजे, सदानंद खारोडे, अरविद तिवाने, ज्ञानू बहाकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत नवनियुक्त मराठा महासंघ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

जाहीर कार्यकारणी मध्ये तेल्हारा तालुका उपाध्यक्ष पदी बेलखेड चे मराठा समाजाचे युवा नेतृत्व पवन उर्फ विक्की पाटील खुमकर यांची, तेल्हारा शहर अध्यक्ष हेमंत पाटील अवचार, प्रमोद तायडे, संदीप पाटील ताथोड तालुका प्रसिद्धि प्रमुख,गौरव पाटील अरबट युवक तालुका उपाध्यक्ष,विशाल पाटील कंकाळे दहिगाव सर्कल प्रमुखपदी यांचा समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. यावेळी तालुका व शहरातील बहूसंख्य मराठा महासंघ पदाधिकारी राजेश वानखेड, सुरज खारोडे,कपिल फोकमारे,भगवान सरोदे इत्यादी उपस्थित होते.