Uncategorizedआपला जिल्हा

श्री क्षेत्र पानेट येथे विकास कामांचे लोकार्पण, दुग्धआभिषेक, आरोग्य शिबीर.

- महाप्रसाद व जल वितरण.

श्री क्षेत्र पानेट येथे विकास कामांचे लोकार्पण, दुग्धआभिषेक, आरोग्य शिबीर.
– महाप्रसाद व जल वितरण.

पानेट तिर्थक्षेत्र (जिल्हा अकोला)
देशाचे माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाशिवरात्री च्या पावनदिनी श्री क्षेत्र पानेट येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विकास कामांचे लोकार्पण, दुग्धआभिषेक, आरोग्य शिबीर, महाप्रसाद व जल वितरण करण्यात आले.

श्री क्षेत्र पानेट येथे खा.अनुप धोत्रे व सौ समीक्षाताई धोत्रे,आमदार रणधीर सावरकर सपत्नीक यांनी भुगर्भग्रहातील स्वयंभु महादेवावर दुग्ध अभिषेक करून पूजाअर्चा केली.
येथे येणाऱ्या भावीकांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून उभारलेल्या २ कोटी ४८ लक्ष रुपयांच्या भव्य सभागृह व स्वछता गृहाचे खा.अनुपभाऊ धोत्रे यांच्या हस्ते, आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थीतीत लोकार्पण करण्यात आले.


थोड्या प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या या संस्थानला आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून भक्तांच्या सोयीसाठी अकोला-अकोट रोड ते श्री क्षेत्र पानेटला जोडणाऱ्या रस्त्यासाठी १ कोटी ७१ लक्ष रुपये मंजूर करुन व रस्ता डांबरीकरन करुन दिल्याबद्दल श्री पानेट संस्थानच्या वतीने आमदार रणधीर सावरकर व खा.अनुपभाऊ धोत्रे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

अकोला जिल्ह्यात प्राचीन महत्व प्राप्त असेललं पानेट सारखं एवढं मोठं धार्मिक स्थळ असतानाही प्रकाशझोतात आलं नाही आणि विकासापासून वंचित राहिलं याची खंत मनात होती त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी ४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला याची माहिती देत या पुढेही येथे येणाऱ्या भविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहू असे वचन हजारो भाविक बंधु भगिनींना आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत औषधोपचार करण्यात आला.
तसेच प्रयागराज येथून आणलेल्या जलाचे सुद्धा भाविकांना वितरण करण्यात आले व साबुदाना उसळ वितरित करण्यात आली.


यावेळी डॉ रणजीत सपकाळ,वसंत बाछुका,प्रकाश पाटील,गिरीश जोशी,माधव मानकर,राजेश नागमते,राजेश रावणकर,मनीष मोडक हर्षल ठाकरे,विवेक भरणे,संतोष शिवरकर,दत्तू पाटील,भूषण बाजारे, विठ्ठल वाकोडे,मधुकर पाटकर,पवन वर्मा,विजूभाऊ सोळंके,शेषराव पाटील वसु,माधव बकाल,मंगेश घुले,बाळूभाऊ धुमाळे,मनोहर चाकोते, ज्ञानेश्वर आडे,निलेश खोटरे,अनुप साबळे,अनिल इंगळे,वसंता दोड, मोहन कपले,संदीप अरबट,नारायण साबळे,निलेश वहिले,समाधान येरोकार,पंजाब थोरात यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी , पानेट संस्थांनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!