आपला जिल्हा अकोला

तेल्हाऱ्यात अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा. 

तेल्हाऱ्यात अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा. 

तेल्हाऱ्यात अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा. 

तेल्हारा : भारतीय जनता पार्टी, तेल्हारा मंडळाच्या वतीने मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचा वाढदिवस सोमवारी तेल्हारा येथे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करून साजरा करण्यात आला. 

तेल्हारा शहरातील पायविहीर श्री गौतमेश्वर संस्थान येथे भगवान शंकराचा विधिवत जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री रामदेवबाबा अन्नदान क्षेत्र येथे महाप्रसादाचे आयोजन करून उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमांमधून आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी भाजपचे सर्व ज्येष्ठ व आजी-माजी पदाधिकारी, नगराध्यक्ष,उपाध्यक्ष, नगरसेवक, सभापती, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाडी व सेलचे प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्कल प्रमुख तसेच समस्त कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!