आपला जिल्हा अकोला

विरशैव मोक्षधाम येथील समस्यांचे निराकरण करा,विरशैव समाज बांधवांची नगराध्यक्षांकडे मागणी. 

विरशैव मोक्षधाम येथील समस्यांचे निराकरण करा,विरशैव समाज बांधवांची नगराध्यक्षांकडे मागणी. 

विरशैव मोक्षधाम येथील समस्यांचे निराकरण करा,विरशैव समाज बांधवांची नगराध्यक्षांकडे मागणी.

तेल्हारा दि :- विरशैव मोक्षधाम येथे पिण्याचे पाणी , लाईट ची व्यवस्था सह अनेक समस्या असून त्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे या करिता विरशैव समाज बांधवांनी तेल्हारा पालिकेच्या अध्यक्षा वैशाली पालिवाल यांच्याकडेनिवेदन देऊन मागणी केली आहे. 

 तेल्हारा शहरातील विरशैव मोक्षधाम येथे पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असून माळेगाव नाका जवळील जलकुंभ वरून पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावे. जेणेकरून पिण्याच्या पाण्याची सोय होईल,तसेच येथे पाण्याची टाकी सुद्धा उभारण्यात यावी येथे पाण्याची व्यवस्था झाल्यास येणाऱ्या जाणाऱ्यांची, शेतमजुरांची पिण्याच्या पाण्याची सोय होईल तसेच स्मशानभूमी समोर धर्माळ बांधल्यास जनावराची पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय होईल मोक्षधाम मध्ये विद्युत पुरवठा नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस दफनविधी करण्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. करीता विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी येथे गवत मोठ्या प्रमाणावर असल्याने दर वर्षी दोन वेडा राउंड-अप ची फवारणी करण्यात यावी शुशोभीकरण करण्यात यावे वृक्षारोपण करण्यात यावे उन्हाळ्यात उन्हाच्या बचावासाठी व पावसाळ्यात पाण्याच्या बचावासाठी टिनशेडची व्यवस्था करण्यात यावी इत्यादी समस्यांबाबत मागणी करण्यात आली या वेळी पालिकेचे बांधकाम सभापती विजयसिह बलोदे व विरशैव समाज बांधव उपस्थित होते .

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!