पूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढविला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.,जलाशयात ७६.६५ टक्के पाणीसाठा; तीन दरवाजे २० सेंमी उघडून ४८.०१ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात.

अमरावती/अकोला दि. ३० जुलै २०२६ : अमरावती जिल्ह्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आज (३० जुलै) सकाळी १० वाजल्यापासून धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.
आज सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्णा प्रकल्पाची जलाशय पातळी ४५०.०९ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, २७.११२४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या धरणात ७६.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजता धरणाचे तीन दरवाजे १० सेंमीवरून २० सेंमीपर्यंत उघडण्यात आले असून, नदीपात्रात ४८.०१ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी व पशुपालकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे पूर्णा मध्यम प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष यांचे कडून करण्यात आले आहे.