भारत सरकारच्या कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती) MCP या अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.,३१ मार्च २०२६ पुर्वी नोंदणी असलेल्या शेतकरी गटांनी महा-डी.बी.टी. या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करावा – तेल्हारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आवाहन.
भारत सरकारच्या कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती) MCP या अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.,३१ मार्च २०२६ पुर्वी नोंदणी असलेल्या शेतकरी गटांनी महा-डी.बी.टी. या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करावा - तेल्हारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आवाहन.
भारत सरकारच्या कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती) MCP या अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.,३१ मार्च २०२६ पुर्वी नोंदणी असलेल्या शेतकरी गटांनी महा-डी.बी.टी. या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करावा – तेल्हारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आवाहन.

कापूस हे भारताचे तसेच महाराष्ट्राचे महत्वाचे पिक असून अर्थव्यवस्थेत त्याला विशेष स्थान आहे. यानुषंगाने भारत सरकारने कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती) MCP या नव्या अभियानाला मान्यता दिलेली आहे. हे अभियान सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत पिक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. पिक प्रात्यक्षिकांतर्गत सधन कापूस लागवड प्रात्यक्षिके, क्लोजर स्पेसीग प्रात्यक्षिके, एकात्मिक पिक उत्पादन प्रात्यक्षिके, स्थानिक पुढाकाराच्या बाबी इत्यादी घटक राबविण्यात येणार आहेत.
सदर प्रात्यक्षिके हे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांच्या मार्फत पिक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. समूह आधारीत असलेली ही प्रात्यक्षिके राबविण्यासाठी ३१ मार्च २०२६ पुर्वी नोंदणी असलेल्या शेतकरी गटांनी महा-डी.बी.टी. या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करावा. प्रती गट कमाल २५ शेतकरी असतील. महा-डी.बी.टी. पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर गटांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या गटांना बियाणे व इतर निविष्ठा ह्या कृषि विभागामार्फत पुरविण्यात येणार आहेत.
तरी तेल्हारा तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरीत महा-डी.बी.टी. या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करुन अर्ज करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.