महाराष्ट्र

शरद पवारांकडून भाई प्रभाकर सावरकर यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाबद्दल गौरव; सुनिताताई अशोक ताथोड यांनी घेतली भेट.

शरद पवारांकडून भाई प्रभाकर सावरकर यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाबद्दल गौरव; सुनिताताई अशोक ताथोड यांनी घेतली भेट.

शरद पवारांकडून भाई प्रभाकर सावरकर यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाबद्दल गौरव; सुनिताताई अशोक ताथोड यांनी घेतली भेट.

सन १९८२ मध्ये मलकापूर ते नागपूर दरम्यान झालेल्या ऐतिहासिक शेतकरी दिंडीत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या साप्ताहिक ‘पूर्णाकाठ’चे संपादक, शेतकरी नेते भाई प्रभाकर सावरकर यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांनी एका पत्राद्वारे केला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) , महाराष्ट्र प्रदेशच्या माजी प्रदेश सरचिटणीस सुनिताताई अशोक ताथोड यांनी १७ मे २०२६ रोजी शरद पवार साहेबांकडे पत्र सादर करून भाई प्रभाकर सावरकर यांच्या योगदानाची माहिती दिली होती.

यावरून शरद पवार साहेबांनी प्रभाकर सावरकर यांच्या शेतकरी चळवळीतील निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि आंदोलनातील कार्यत्परतेबद्दल गौरव करणारे स्वाक्षरीचे पत्र प्रदान केले.

या संदर्भात सुनिताताई अशोक ताथोड यांनी ३० मे २०२६ रोजी शरद पवार साहेबांना पाठवलेल्या आभार पत्रात म्हटले आहे की, “एक तळागाळातील कार्यकर्त्याच्या आणि चळवळीच्या पाठीवर आपण कौतुकाची थाप ठेवली आहे. आपल्या या निर्णयामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यात अधिक जोमाने काम करण्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे.

।।मा.शरदचंद्र पवार यांचे पत्र मजकूर।।

सन १९८२मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक शेतकरी दिंडी आंदोलनामध्ये साप्ताहिक पूर्णाकाठ संपादक माननीय भाई प्रभाकर सावरकर यांनी सक्रिय उल्लेखनीय सहभाग नोंदवला होता.        

सदर दिंडीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे जनजागृती केली तसेच संघटनात्मक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले शेतकरी चळवळीशी असलेली त्यांची निष्ठा सामाजिक बांधिलकी आणि आंदोलनातील त्यांची कार्य तत्परता ही निश्चितच प्रेरणादायी व स्मरणीय आहे .       

     शेतकरी हितासाठी त्यांनी केलेले योगदान आणि समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी स्मरणीय आहे. 

शरद पवार ,संसद सदस्य (राज्यसभा )दिनांक २०मे २०२६

 

 

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!