NTA मध्ये झाले काही मुख्य बदल आणि नवीन सुधारणा.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक अतिशय मोठा आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे.
NTA मध्ये झालेले मुख्य बदल आणि नवीन सुधारणा –
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती:-
NTA चे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी भारत सरकारमधील ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची (२ संयुक्त सचिव स्तर आणि २ संचालक स्तर) नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी परीक्षेचे नियोजन अधिक काटेकोरपणे करतील.
AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:-
परीक्षांमध्ये कोणतीही गैरसोय किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून *Chief Technology Officer (CTO)* ची नियुक्ती केली जात आहे. यामध्ये बायोमेट्रिक, फेस ऑथेंटिकेशन आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे कडक देखरेख ठेवली जाईल.
पारदर्शक आर्थिक आणि मनुष्यबळ व्यवस्थापन:- संस्थेमध्ये सर्वोत्कृष्ट प्रणाली लागू करण्यासाठी *Chief Finance Officer (CFO)* आणि *General Manager – HR (GM-HR)* अशी तज्ज्ञ पदे भरली जात आहेत.
सुरक्षित परीक्षा पद्धत:- प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांचे भाषांतर, छपाई आणि वाहतूक यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत सुरक्षित बदल केले जात आहेत.
तक्रार निवारण प्रणाली:- विद्यार्थ्यांच्या शंका आणि तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे.
दरवर्षी कोट्यवधी विद्यार्थी NTA च्या परीक्षा देतात झाले प्रकारामुळे शासनाने घेतलेला निर्णय मुळे आता प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला त्याचा हक्क आणि न्याय नक्कीच मिळणार असल्याचे दिसते तसेच इतर अधिकृत माहितीसाठी NTA च्या संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करावी..🌐 www.nta.ac.in
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे…शुभम देशमुख, चाणक्य करियर पाॅइंट अकोला.
अलीकडच्या काळातील घटनांमुळे निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन, परीक्षा व्यवस्थेची अखंडता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असल्याचे वाटते…डॉ. तात्विक तुरखडे (MBBS) उडाण एज्युकेशन अकोला
