संतश्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथील बालसंस्कार शिबिराचा उद्घाटन संपन्न.
संतश्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथील बालसंस्कार शिबिराचा उद्घाटन संपन्न.
संतश्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथील बालसंस्कार शिबिराचा उद्घाटन संपन्न.

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा संचालित संतश्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या कुशल नेतृत्वात गत २० वर्षापासून सालाबाद प्रमाणे शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने यशस्वीरित्या आयोजित होत असणाऱ्या श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचा १.५.२०२६ दुपारी पाच वाजता औपचारिक उद्घाटन सोहळा ज्येष्ठ भागवताचार्य श्रीयुत शिवाजी महाराज टाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर संचालक श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले असता मी स्वतः बाल संस्कार शिबिराच्याच माध्यमातून घडलो असल्यामुळे कृतज्ञता म्हणून दरवर्षी कार्यक्रमाची कितीही व्यस्तता असली तरी, श्रीगुरूंच्या आज्ञे मुळे हा संपूर्ण मे महिना बाल संस्काराकरिता आजीवन कायम स्वरूपी राखीव ठेवून या कालखंडात मी क्षेत्र संन्याशावत व्रतस्थ जीवन जगत असल्यामुळे कृपया माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भाविक संद्भक्तानी प्रापंचिक तथा पारमार्थिक अशा कुठल्याही कार्यक्रमाकरिता आमच्याकडे या असा आग्रह करून, धर्म संकटात न टाकता आमच्या सार्वजनिक तथा व्यक्तिगत साधनेस सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले.

तसेच त्यांनी शिबिराचा उद्देश व उपलब्धी या विषयावर सुद्धा आपल्या स्वतंत्र शैलीतून प्रकाश टाकला. कुठल्याही प्रसिद्धी शिवाय शिबिरार्थींची दिवसेंदिवस वाढत असणारी संख्या लक्षात घेता समाजातील दानशूरदात्यांनी भगवान जगन्नाथांचा हा संस्काररुपी रथ ओढण्यास सहकार्य करण्याची सुद्धा बहुसंख्येने उपस्थित पालक व दर्शनार्थींना विनंती केली.तसेच यावर्षी दुग्ध शर्करा न्यायाने १७ मे असून, पुरुषोत्तम मासाचा योग जुळून येत असल्यामुळे २१ मे ला गुरुपुष्यामृत या त्रिवेणी संगमावर श्रीगुरु ज्ञानेश्वरजी महाराज वाघ यांचा संस्थेच्या संपूर्ण आजी – माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सव करण्याचे ठरले असून, त्या अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात श्रीगुरुंच्या पंचधान्य तथा नाणेतुलेचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तरी उपरोक्त कार्यक्रमाकरिता सर्व पालक, दर्शनार्थी तसेच संस्थेवर नितांत प्रेम करणाऱ्या संपूर्ण भाविक सद्भक्तांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा हस्ते पर हस्ते तन-मन-धनाने सगळं हाताने मदत करण्याचे आवाहन शिबिर व्यवस्थापक भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी केले.