नगर परिषद तेल्हारा हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा. ,भारतीय जनता पक्ष तेल्हारा मंडळ व युवा मोर्चाचे आयोजन.
नगर परिषद तेल्हारा हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा. ,भारतीय जनता पक्ष तेल्हारा मंडळ व युवा मोर्चाचे आयोजन.
नगर परिषद तेल्हारा हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा. ,भारतीय जनता पक्ष तेल्हारा मंडळ व युवा मोर्चाचे आयोजन.

तेल्हारा नगर परिषद परिसरातील हुतात्मा स्मारक येथे भारतीय जनता पक्ष तेल्हारा मंडळ व युवा मोर्चा अकोला जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करून साजरा करण्यात आला.
यावेळी हुतात्मा स्मारक येथे स्मारकाचे पूजन करण्यात आले, तसेच महाराष्ट्र दिन, कामगार दिन,बुद्ध पोर्णिमा निमीत्ताने छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन करण्यात आले तसेच जे कामगार दिवस रात्र कष्ट करतात त्यांचे सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये तेल्हारा मंडळ भारतीय जनता पक्ष अध्यक्ष गणेश रोठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र हे शेतकरी कष्टकरी आणि कामगाराचे हित जोपासणारे राज्य आहे असे विचार भाजमुयो जिल्हाध्यक्ष योगेश गोतमारे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा तथा महिला जिल्हाध्यक्षा जयश्रीताई पुंडकर, न. प. अध्यक्षा सौ वैशालीताई पालीवाल,नगर परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील तायडे, भाजयुमो जिल्हाचिटणीस मयुर चहाजगुणे, महामंत्री रामेश्वर हागे, गटनेता अतुल विखे, भाजमुयो मंडळ अध्यक्ष शिवा खाडे, तारुशेठ पालीवाल, सभापती साक्षी वानखडे, सतीश जयस्वाल,सौ.रुपाली हागे, नगरसेवक गजानन गायकवाड, सौ. मोणीकाताई वाघ, जितेंद्र राठी, रुपेश चव्हाण,सौ. बग्गनताई, ओम सुईवाल, छोटू गावत्रे ,गणेश इंगोले,भाजमुयो अकोट अध्यक्ष मयुर नाठे, शशी तराळे , छोटू गावत्रे, अँड पवन शर्मा, अक्षय मोहोड, ,अक्षय पदवाळ, सागर नेरकर, योगेश बिडवे,गजानन गावत्रे ,जितेंद्र पालीवाल,राहुल धामोडे, श्रीकांत खाडे, पार्थ देशमुख,धिरज नेमाडे,अभी मंगळे, गोलू देंडवे इत्यादी उपस्थित होते.