1 मे महाराष्ट्र दिन तेल्हारा तहसील कार्यालयात साजरा,तहसीलदारांचे हस्ते ध्वजारोहण. ,स्व-गणना पत्रिका विमोचन करून जनगणना 2027 ची सुरुवात.
1 मे महाराष्ट्र दिन तेल्हारा तहसील कार्यालयात साजरा,तहसीलदारांचे हस्ते ध्वजारोहण. ,स्व-गणना पत्रिका विमोचन करून जनगणना 2027 ची सुरुवात.
1 मे महाराष्ट्र दिन तेल्हारा तहसील कार्यालयात साजरा,तहसीलदारांचे हस्ते ध्वजारोहण. ,स्व-गणना पत्रिका विमोचन करून जनगणना 2027 ची सुरुवात.

तेल्हारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार, १ मे रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र दिनाचा ६७ वा स्थापना दिवस समारंभी तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला. यावेळी स्व-गणना पत्रिका विमोचन करून जनगणना 2027 ची सुरुवात करण्यात आली.या समारंभास तहसील कार्यालय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक,माजी सैनिक संघटना पदाधिकारी, पत्रकार इत्यादी उपस्थित होते.

1 मे रोजी तेल्हारा तहसील कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी ८ वाजता तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या हस्ते पार पडला, राष्ट्रगीत, वंदेमातरम् व महाराष्ट्र गीत होवून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात तहसीलदारांनी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि प्रगतीचा वारसा आपण सर्वांनी जोपासला पाहिजे,” असे आवाहन करून शासनाच्या स्व गणना, जनगणना 2027 बाबत सहकार्य करण्याचे सुचवले व स्व गणना पत्रिकांचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत केले.यावेळी ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांनी विचार व्यक्त केले तर नायब तहसीलदार विकास राणे यांनी 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पोर्णिमेच्या त्रिवेणी संगमावर आजच्या दिवशी विशेष शुभेच्छा देवून शासकीय योजनांची माहिती देवून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

आयोजित या कार्यक्रमाला ठाणेदार तेल्हारा पोलीस कर्मचारी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल सहायक,जेष्ठ नागरिक संघ, माजी सैनिक संघटना पदाधिकारी,नगरसेवक,पत्रकार बांधव, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजरोहण संचालन तेल्हारा पोलीस स्टेशन चे पि एस आय निलेश ठाकरे सह पोलीस कर्मचारी चमु तथा कार्यक्रम संचालन अंकुश मानकर यांनी केले.