रखरखत्या उन्हात मायेची सावली झाडे व तहान भागवते पाणपोई., कोठा ग्रामपंचायत व लोकजागर ची पाणपोई सेवा.
रखरखत्या उन्हात मायेची सावली झाडे व तहान भागवते पाणपोई., कोठा ग्रामपंचायत व लोकजागर ची पाणपोई सेवा.
रखरखत्या उन्हात मायेची सावली झाडे व तहान भागवते पाणपोई., कोठा ग्रामपंचायत व लोकजागर ची पाणपोई सेवा.

रखरखत्या उन्हात झाडे मायेची सावली देतात तसेच वाटसरूंना पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी पाणपोई ही कडक उन्हाळ्यात महत्वाची ती गरज ठरते ती सेवा भावी गरज ओळखून तेल्हारा तालुक्यातील कोठा ग्रामपंचायत व लोकजागर मंच च्या वतीने नुकतेच पाणपोई सेवा सुरू करण्यात आली.
पाणपोई ही माणुसकी धर्मांच्या भावनेतून सुरू करण्यात येतात दरवर्षी उन्हाळ्यात काही सेवा भावी संस्था,संघटना हा उपक्रम राबविता. परंतु थंडगार पाण्याचा माठाच्या पाणपोई ची जागा काही ठिकाणी कॅनच्या पाण्याने घेतली असली तरी पाणपोई सेवा धर्म म्हणून सुरूच आहेत. पाणपोई चा सामाजिक, माणुसकी धर्म जपत तालुक्यातील कोठा येथील लोकजागर मंच व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रायखेड रस्त्यावरील दीपक अहेरकर यांच्या घरासमोर दरवर्षी प्रमाणे पानपोई सुरू करण्यात येवून प्रवासी तथा वाटसरूंची पाण्याची तहान भागवली जात आहे.
लोकजागर मंच तथा ग्रामपंचायत कोठा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या पाणपोई च्या उदघाट्न प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच हरिभाऊ गावंडे, ग्रामपंचायत सदस्य दिपक अहेरकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक विश्वासराव अहेरकर ,पंजाबराव अहेरकर, माधवराव विखे, संदीपराव अहेरकर, सोपान अहेरकर,सत्यविजय अहेरकर इत्यादी उपस्थित होते.