महाराष्ट्र

बी एल ओ सह सर्वच अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करून शिकवू द्या.- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील यांचे पुरोगामी राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन.

बी एल ओ सह सर्वच अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करून शिकवू द्या.- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील यांचे पुरोगामी राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन.

बी एल ओ सह सर्वच अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करून शिकवू द्या.- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील यांचे पुरोगामी राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांना बी एल ओ सह इतर सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करून फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.

        पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले बी एल ओ चे काम पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयातील शिक्षकांना सम प्रमाणात द्यावयाचे शासन निर्देश असताना बहुतांश प्राथमिक शिक्षकांना हे काम देणे व शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादने हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवरही मोठा अन्याय असल्याने यातून शिक्षकांना मुक्त करून ही कामे स्वतंत्र यंत्रणेकडे देणे हाच एकमेव पर्याय असल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.

       राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गाना नियुक्त असलेले सर्वच विषय शिक्षकांचे अध्यापक कामकाज सामान आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने १३ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार फक्त ३३% विषय शिक्षकांना सेवा जेष्ठतेनुसार पदवीधर वेतनश्रेणी मिळते. ही बाब अन्यायकारक असल्याने, समान काम समान वेतन या तत्वानुसार राज्यातील सर्वच (१००%) विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळवी यासाठीही शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी स्पष्ट केले.

       राज्य नेते विजय भोगेकर म्हणाले संघटन हीच शिक्षकांची ताकद असून राज्यातील शिक्षकांनी विषयानुरूप गट न करता सर्वांनी संघटित होवून शासनाच्या अयोग्य धोरणाविरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे.

     महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर म्हणाल्या पुरोगामी शिक्षक परिवारात पुरुषांच्या बरोबरीने महिलांही कार्यकारणी मध्ये स्थान देवून महिलांचा सन्मान केला जातो. यामुळे महिलांना स्वतंत्र व्यासपीठ मिळाले आहे.

      सभेत ज्या जिल्ह्यात निवड श्रेणी प्रस्ताव प्रलंबीत आहेत ते तत्काळ मंजूर व्हावेत, मेडिकल बिल कॅश लेस पद्धत सुरु करावी , दिव्यांग, वय वर्षे 50 पूर्ण व आरोग्याची समस्या असलेल्या शिक्षकांना जनगणना कामातून वागळावे, जनगणना पूर्ण होताच कार्यमुक्ती या अटीवर जिल्हातंर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करावी आणि बदली नंतर सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, पदोन्नतीने भरावयाची व रिक्त असलेली विस्तार अधिकारी श्रेणी २ व श्रेणी ३, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व विषय पदे ३१ मे पूर्वी पदोन्नतीने भरण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनास व्हावेत आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.

     दरम्यान रत्नागिरी जिल्हा शाखेने प्रसिद्ध केलेले कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

       सभेस राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या सह राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य कोषध्यक्ष जी एस मंगनाळे, उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, विविध जिल्हातील प्रतिनिधी के एस पाटील, सुनिल पवार, श्रीकांत टिपूगडे, संजय गांगण, रंगराव वाडकर,इरफान मिर्झा, प्रमोद मुकेमवार, गोकुळ चारथळ, देवराव आमोदे, चंद्रकांत मोरे, संघर्षकुमार सावरकर, मनोहर पेठकर, प्रदीप पवार, यशवंत पेढांबकर, शशिकांत सपकाळ, विनोद घडशी, सुरेश धुमाळ आदी संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!