आपला जिल्हा अकोला

साई फ्लेक्सचे संचालक जितेंद्र आप्पा मिटकरी अकोला वैभव पुरस्काराने सन्मानित.,माऊली फाउंडेशनचा उपक्रम.

साई फ्लेक्सचे संचालक जितेंद्र आप्पा मिटकरी अकोला वैभव पुरस्काराने सन्मानित.,माऊली फाउंडेशनचा उपक्रम.

साई फ्लेक्सचे संचालक जितेंद्र आप्पा मिटकरी अकोला वैभव पुरस्काराने सन्मानित.,माऊली फाउंडेशनचा उपक्रम.

अकोला: येथील साई फ्लेक्सचे संचालक, युवा उद्योजक जितेंद्र आप्पा मिटकरी यांचा अकोला वैभव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. माऊली फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

         कृतिशील शिक्षक असलेले ज्ञानेश्वर मांडेकर अध्यक्ष असलेल्या माऊली फाउंडेशनने हा पुरस्कार दिला आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजातील चांगले काम करणारे अधिकारी, उद्योजक आणि सामाजिक चळवळीतील काहींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. शुक्रवारी माऊली फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी साई फ्लेक्स येथे येऊन जितेंद्र आप्पा मिटकरी यांना सन्मानित केले. अतिशय कमी वयात मोठी जबाबदारी स्वीकारून ग्राहकांना चांगली सेवा देण्याबरोबरच अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे हे काम उल्लेखनीय असल्याचे मत या प्रसंगी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडेकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार ॲड.सुधाकर खुमकर तथा माऊली फाउंडेशनचे पदाधिकारी गोकुळ कलंत्री, सय्यद रब्बानी, अशोक पारधी, संजय आप्पा माहोरे, हरीओम माहोरे च्या सह साई फ्लेक्सचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!