छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.१ बाबत तहसीलदार तेल्हारा महेश रामगुंडे यांची पत्रकार परिषद.
तेल्हारा तालुक्यात मंडळ निहाय समाधान शिबीराचा कार्यक्रम जाहीर जनतेने लाभ घ्यावा.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.१ बाबत तहसीलदार तेल्हारा महेश रामगुंडे यांची पत्रकार परिषद.
तेल्हारा तालुक्यात मंडळ निहाय समाधान शिबीराचा कार्यक्रम जाहीर जनतेने लाभ घ्यावा.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.१ बाबत तहसीलदार तेल्हारा महेश रामगुंडे यांनी दिनांक 05 मार्चला तेल्हारा तालुक्यातील प्रिंट मिडीया व ईलेक्टॉनिक मिडीया यांची पत्रकार परिषद घेऊन मंडळ निहाय तारखा व नोडल अधिकारी कार्यक्रम माहीती दिली यावेळी तेल्हारा येथील पत्रकार बांधव उपस्थित होते.

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/ प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना Single Day Service Delivery द्वारा सेवा पुरविणे साठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ आहे. अंतर्गत विविध शासकीय विभाग जसे पंचायत समिती,आरोग्य विभाग,कृषी विभाग,वन विभाग व ईतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेशी समन्वय साधून त्यांचा सहभाग सदर अभियानामध्ये राहणार आहे.
मंडळ निहाय शिबिराकरीता अधिका-यांची नोडल अधिकारी म्हणून याव्दारे नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ निहाय तारीख व नोडल अधिकारी तहसीलदार/नायब तहसीलदार राहतील त्यामध्ये पाथर्डी येथे 7 मार्चला तहसीलदार महेश रामगुंडे, पंचगव्हाण 14 मार्चला नायब तहसीलदार रेखा किर्तीवार, माळेगाव 10 एप्रिल ला ज्योती नारगुंडी, अडगाव बु 17 एप्रिल ला संजय ढगे, हिवरखेड 8 मे ला विकास राणे, तेल्हारा 15 मे ला विकास राणे राहतील.
या प्रमाणे एक दिवसीय समाधान शिबीराचे महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद नगर पंचायत स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन तसेच तळागाळातील लोकांपर्यंत विविध योजना पोहचवण्यासाठी तेल्हारा तालुक्या मध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांनी सांगितले असून तालुक्यातील प्रत्येक मंडळातील ग्रामस्थांनी आप आपल्या दिलेल्या तारखांना मंडळ निहाय मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व समाधान शिबीरातील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.