देशाला पुनश्च नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून ऋषी व कृषींचे संयुक्त मेळावे होणे काळाची गरज आहे.,आजचा ज्ञानेश आश्रमात ऋषी आणि कृषी परंपरेचा अनोखा संगम स्वप्नवत भारत – भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.
देशाला पुनश्च नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून ऋषी व कृषींचे संयुक्त मेळावे होणे काळाची गरज आहे.,आजचा ज्ञानेश आश्रमात ऋषी आणि कृषी परंपरेचा अनोखा संगम स्वप्नवत भारत - भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.
देशाला पुनश्च नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून ऋषी व कृषींचे संयुक्त मेळावे होणे काळाची गरज आहे.,आजचा ज्ञानेश आश्रमात ऋषी आणि कृषी परंपरेचा अनोखा संगम स्वप्नवत भारत – भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आयोजित कृषी अभ्यास दौरा मेळावा ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे संपन्न झाला आहे. यावेळी अमरावती येथील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. शेतकऱ्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठी प्रत्यक्ष शेती भेट दिली.
भारत हा नुसता कृषी प्रधान देश नसून , तो अनाधिकाला पासून ऋषी आणि कृषीचा देश आहे. परंतु मुगल आणि इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जुलमी कालखंडामध्ये ऋषी परंपरेचा ऱ्हास होत गेला परिणामी एकेकाळी विश्वात एक असणाऱ्या देशाला प्रत्येक गोष्टी करीता इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा कृषी प्रधान देश सुद्धा राजकीय ध्येयधोरणांमुळे पूर्णतः वाकल्याचे निदर्शनास यायला लागले अशा परिस्थितीत या देशाला पुनश्च नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून ऋषी व कृषींचे संयुक्त मेळावे होणे काळाची गरज असल्यामुळेच आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ या ठिकाणी ऋषी व कृषी चा अनोखा संगम पहायला मिळाला हे उल्लेखनीय आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत ज्ञानेश आश्रमाचे अध्यक्ष भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा छोटेखानी हृद्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड गजाननराव पुंडकर उपाध्यक्ष, ॲड जयवंतराव उपाख्य भैय्यासाहेब पाटील पुसदेकर उपाध्यक्ष, केशवराव मेतकर उपाध्यक्ष, सुरेशदादा खोटरे कार्यकारिणी सदस्य, प्रा सुभाषराव बनसोड कार्यकारिणी सदस्य, विजय ठोकळ स्विकृत सदस्य, शेषराव खाडे माजी सचिव, प्राचार्य नंदकिशोर चिखले, बाळासाहेब पाटील, साहेबराव सोनमाळे, दादासाहेब पाटील, सुरेश पाटील आढे, रमेशभाऊ कोकाटे, दिनकरराव जायले, मधुसूदन खोटरे, नारायण देवतळे,सुधीर बापू देशमुख, गोपाळ येऊल पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच अमरावती व अकोट, तेल्हारा येथील आजिव सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ गोपाल ढोले सर यांनी केले. सुत्र संचालन शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांनी केले तर आभार अंकेश विलासराव भांबुरकर यांनी व्यक्त केले.