आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

अकोला कृषी विद्यापीठात फळे भाजीपाला फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या शिवार फेरीचे आयोजन!

शाश्वत शेतीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार दोन दिवसीय शिवार फेरी!

अकोला कृषी विद्यापीठात फळे भाजीपाला फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या शिवार फेरीचे आयोजन!

शाश्वत शेतीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार दोन दिवसीय शिवार फेरी!

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा, पाणी फाउंडेशन आदींचे सहयोगातून दिनांक 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 असे दोन दिवस फळे भाजीपाला फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

” हॉर्टिकल्चर डे ” उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा महत्वकांक्षी उपक्रमात मुख्यतः जिरायती शेती पद्धतीचा वापर असलेल्या विदर्भातील शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांचा लाभ घेत अनेकानेक शेतकरी कुटुंब आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होतं आहेत. शेतातून प्रयोगशाळेकडे या तत्त्वाने अग्रेसित या विद्यापीठाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रदीर्घ अनुभवी मार्गदर्शनात अत्याधुनिक कृषी शिक्षण, कालसुसंगत कृषी संशोधनासह नाविन्यपूर्ण कृषी विस्ताराचे माध्यमातून कृषी विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान गाव खेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्यरत विविध शासकीय, निमशासकीय, सेवाभावी, सहकारी, खाजगी विभागाचे एकात्मिक प्रयत्नांचा पुरस्कार केला आहे. याच उपक्रमांतर्गत आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग व प्रात्यक्षिके याची देही याची डोळा बघण्यासाठी उपलब्ध करीत केवळ अवलोकोनच नव्हे तर लागवडीपासून प्रक्रिया सहित बाजारपेठेतील विपणनाचे बारकावे आदींची तांत्रिकदृष्ट्या सांगड घालण्याचे कसब देखील या निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आत्मसात करायला मिळत आहे.

 याच श्रृंखलित विदर्भातील वातावरणात उत्पादित होणारे व बाजारपेठेत चांगली मागणी असणारे फळे भाजीपाला फुलपिके औषधी व सुगंधी वनस्पती पिकांचे जिवंत प्रात्यक्षिके याची देही याची डोळा पाहण्याची व शास्त्रज्ञांकडून लागवड तंत्रज्ञान जाणून घेण्याची सुवर्णसंधी शेतकरी बंधू-भगिनींना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा, पाणी फाउंडेशन आदींचे सहयोगातून दिनांक 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 असे दोन दिवस उपलब्ध करून दिली आहे. उपरोक्त दोन्ही दिवस विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकरी बांधव भगिनींचे अवलोकनासाठी खुले राहणार असून विविध चर्चासत्रांचे माध्यमातून शास्त्रज्ञांकडून शंका समाधान देखील होणार आहे. याप्रसंगी कृषीविषयक प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 यंदाच्या हॉर्टिकल्चर डे चे ठळक वैशिष्ट्ये –

 एकूण 370 एकर क्षेत्रावर उद्यानविद्याविषयक 703 पिकांचे प्रात्यक्षिके यामध्ये 33 विविध भाजीपाला पिकांचे 38 वाण, 20 एकर क्षेत्रावर भाजीपाला लागवड प्रात्यक्षिके  फळ पिकांच्या 42 वाणांचे 300 एकर क्षेत्रावर लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिके 10 एकर क्षेत्रावर 540 औषधी व सुगंधी वनस्पती पिकांची प्रात्यक्षिके, सदर दोन दिवसीय उद्यानविद्या विषयक शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्रक्षेत्रावर संपन्न होणार आहे.

 केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी बंधू-भगिनी, कृषीशी निगडित विस्तारकर्ते, अधिकारी- कर्मचारी, युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी युवक- युवती आदिनी अद्वितीय संधीचा स्वतः लाभ तर घ्यावाच मात्र सोबतच आपले संपर्कातील इतरांना देखील यां विषयी माहिती द्यावी असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.

 सदर दोन दिवसीय हॉर्टिकल्चर डे च्या आयोजनासाठी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे,अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे यांचे मार्गदर्शनात उद्यानविद्या महाविद्यालयाचे सर्व अधिकारी- कर्मचारी तथा आयोजनासाठी गठित सर्व समित्यांचे अध्यक्ष- सचिव तथा त्यांचे सर्व सहकार्य अथक परिश्रम घेत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!