आपला जिल्हा अकोलाआपला जिल्हा बुलढाणा

वानखेड दुर्गादैत्य येथील श्री संत गजानन महाराज मंदीर चा पर्यावरण संरक्षक उपक्रम., डिस्पोजेबल पेक्षा स्टील प्लेट न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा.

वानखेड दुर्गादैत्य येथील श्री संत गजानन महाराज मंदीर चा पर्यावरण संरक्षक उपक्रम., डिस्पोजेबल पेक्षा स्टील प्लेट न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा.

वानखेड दुर्गादैत्य येथील श्री संत गजानन महाराज मंदीर चा पर्यावरण संरक्षक उपक्रम., डिस्पोजेबल पेक्षा स्टील प्लेट न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा.

पर्यावरणीय महत्त्व समजणे समाजातील प्रत्येक घटकासाठी अगत्याचे आहे. पर्यावरण दुषित होण्यासाठी समाज जबाबदार ठरतो तसाच त्याचे संरक्षण सुद्धा समाजच करू शकतो. समाजात प्रत्येक गावात शहरात सामुदायिक कार्य होत असतात हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात त्यामध्ये आपल्या वापरातून पर्यावरण दुषित होवू नये हि जबाबदारी प्रत्येकाची आहे ही जबाबदारी संस्था, संघटना यांनी घेतल्यास मोठा बदल दिसू शकतो. पर्यावरण संरक्षक असाच एक स्तुत्य उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड दुर्गादैत्य येथील श्री गजानन महाराज मंदीर संस्थान ने घेतला आहे. लोकांनी डिस्पोजेबल चा अतीवापर टाळावा म्हणून त्यांनी डिस्पोजेबल पेक्षा स्टील प्लेट न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा असा उपक्रम सुरू केला आहे. घरगुती भंडारे, मंडळांचे भंडारे इत्यादी मध्ये वापरा करिता स्टील चे ताट , ग्लास, चमचे निःशुल्क देवून न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा असा पर्यावरण संरक्षक उपक्रम सुरू केल्याने डिस्पोजेबल वर होणारा खर्च भांडी स्वच्छ करणाऱ्या कामगारांना दिला जावा हा उदात्त हेतू दिसून येतो. पर्यावरण संवर्धनासाठी, शेती, माती, पशु रक्षणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी आपण नक्कीच करू शकतो असे दिसते यातून आपलं गाव , शहर डिस्पोजेबल च्या कचऱ्यापासून आपण मुक्त करू शकतो आणि पर्यावरण ऱ्हास थांबवू शकतो. वानखेड दुर्गादैत्य येथील श्री संत गजानन महाराज मंदीर चा पर्यावरण सरक्षक स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या मधून प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रेरणा घेऊन मंदीर संस्थान चा आदर्श घ्यावा असे दिसून येते अशा उपक्रमातून इतरही मंदीर संस्थानाचे समाज घटकासाठी चे कार्य दिसावे हि अपेक्षा व्यक्त केले जात आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!