आपला जिल्हा

मराठा समाजाने ठरवून दिलेल्या आचार संहितेचे पालन करून अकोला शहरात पहिला आदर्श विवाह संपन्न.

पाटील समाज वर-वधू सुचक केंद्र द्वारा आदर्श विवाहाची मुहूर्तमेढ.

मराठा समाजाने ठरवून दिलेल्या आचार संहितेचे पालन करून अकोला शहरात पहिला आदर्श विवाह संपन्न.
पाटील समाज वर-वधू सुचक केंद्र द्वारा आदर्श विवाहाची मुहूर्तमेढ.

अकोला- पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राद्वारा गेल्या काही वर्षांपासूनच समाजातील गोरगरीब वर-वधूंचे विवाह आदर्श पद्धतीने लावल्या जात आहेत. अगदी पन्नास लोकांच्या उपस्थितीत तर कधी फक्त चहा पाण्यावर विवाह लावण्याची आदर्श परंपरा पाटील समाज वर-वधू सुचक केंद्र-कडून गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यात आता पाटील समाज द्वारा आदर्श विवाहासाठी आचारसंहिता निश्चित करण्यात आलेली आहे. मंडळाची आदर्श परंपरा व समाजाने निश्चित केलेली आचारसंहिता यानुसार अकोला शहरात आणखी एक आदर्श विवाह रविवार दि. ८ जून रोजी पार पडला.
पाटील समाज वर-वधू सूचक केंद्र अकोला, लग्न गाठी वेबसाईड च्या माध्यमातून आता पर्यंत ५८० विवाह जुळविण्यात आले. त्यापैकी यावर्षी ३८६ विवाह पक्के झाले. यावर्षी २८ आदर्श विवाह सोहळे फक्त चहा-फराळावर करण्यात आले. त्यामध्ये रविवार दि. ८ जून रोजी चि. सौ. कां. दुर्गा ओंकार टोळे अकोला व चि. हरीश सुधाकर दाणे यांचा विवाह पाटील समाज वर-वधू सूचक केंद्र अकोला, लग्न गाठी वेबसाईट च्या माध्यमातून जुळविण्यात आला. या सोयरीकमध्ये डॉ. अशोक ओळंबे, ॲड. संतोष गोळे, माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी मध्यस्थी करून अवघ्या ७ दिवसात विवाह पक्का करून मुला मुलीच्या घरी जेवन न करता नुसतीच मराठा समाजाने ठरवून दिलेली आचार संहीता पाळून हा विवाह अगदी साध्या पद्धतीने १०० लोकांच्या उपस्थिती मध्ये दि. रविवारी ८ जून रोजी सकाळी ९ वाजता आर्य समाज हॉल, गांधी रोड अकोला येथे संपन्न करण्यात आला. या लग्नाची पूर्ण जबाबदारी पाटील समाज वर-वधू सूचक केंद्र अकोला यांनी पार पाडली.


एक आदर्श समाज घडविण्यासाठी असे लग्न लावणाऱ्या मुला-मुलींच्या आई वडिलांचा सत्कार मंडळाकडून करण्यात येते. त्यानुसार मुलाच्या वडिलांचा सत्कार डॉ. अमोल रावणकर यांच्या हातून तर मुलीच्या आई वडिलांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव भडांगे यांच्या हस्ते शाल, शिफळ, मंडळाचे प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. तर मुलीच्या आईला मदतीचा चेक सौ. सविताताई अढाऊ व सौ. स्वाती कडाळे यांच्या हातून देण्यात आला. अकोला जिल्हयामध्ये सामाजिक बांधिलकी असलेले मंडळ स्वतः मेळावे घेते. स्वतः लग्न जुळविते आणि लावून सुद्धा देते. अकोला जिल्हयामध्ये फार मोठे कार्यकर्ते या मंडळा कडे आहेत. समाज बांधवांना विनंती करण्यात येते की अजून कोणाच्या मुला मुलीचे लग्न १०० लोकांच्या उपस्तिथी मध्ये लावायचे असेल तर मंडळाकडून हॉल आणि जेवन आणि ब्राम्हणचा खर्च करण्यात येते. वसंत माळी, चंद्रशेखर पांडे गुरुजी, श्रीकृष्ण झटाले, संजय इंगळॆ, चंद्रकांत ताठे हिमंतराव पोहरे, रामदास इंगळे, विशाल लांडे, उमेश वाकडे, मंचितराव पोहरे, संतोष आखरे, सुधीर गावंडे, विनायक धोरण, विठ्ठल गावंडे, विशाल रोडे, ज्ञानेश्वर गुरसाळे,सौ. संगीता ओळंबे, सौ. शिल्पा गावंडे, सौ. स्वाती झांबरे, समाधान झाडोकार, सुनील बाठे, शिवदीप झांबरे, गजानन दाणे, प्रशांत गावंडे यांची रविवारी पार पडलेल्या आदर्श विवाह सोहळ्याला उपस्थिती होती.
पाटील समाज वर-वधू सूचक केंद्राच्या https://lagnagathi.in या वेबसाईटवर पालकांनी आपल्या उपवर वधूंची नोंदणी करावी. तसेच आदर्श विवाह सोहळा किंवा वेबसाईट बाबत काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास सचिन म्हैसने ९९११३०००६/ ८४८४९०६६५५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पाटील समाज वर वधू सूचक केंद्र कडून करण्यात आले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!