आपला जिल्हा अकोलाधार्मिक

बंधुभाव प्रेम व एकतेचे प्रतीक पवित्र रमजान महिना प्रारंभ. तालुक्यातील विविध मस्जिद सह शहरातील तकिया व जामा मस्जिद रंगरंगोटी व रोषणाईने सजली.

बंधुभाव प्रेम व एकतेचे प्रतीक पवित्र रमजान महिना प्रारंभ. तालुक्यातील विविध मस्जिद सह शहरातील तकिया व जामा मस्जिद रंगरंगोटी व रोषणाईने सजली.

बंधुभाव प्रेम व एकतेचे प्रतीक पवित्र रमजान महिना प्रारंभ. तालुक्यातील विविध मस्जिद सह शहरातील तकिया व जामा मस्जिद रंगरंगोटी व रोषणाईने सजली.

तेल्हारा दि.१८ – मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र उपवासाचा रमजान महिना गुरुवार दि.१९ फेब्रुवारी २०२६ पासून आरंभ होत असून तेल्हारा तालुक्यातील बेलखेड,माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव, दानापूर, भांबेरी,पंचगव्हाण,सह विविध गावातील मस्जिद व तेल्हारा शहरातील तकिया मस्जिद व जामा मस्जिदला रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आबाल वृद्ध मुस्लिम बांधवांमध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुस्लिम धर्मात पवित्र रमजान महिना बंधुभाव, प्रेम व एकतेचे प्रतीक मानले जाते. आपसातील कटूता संपुष्टात आणून एक दुसऱ्याला मदत करण्यासाठीची शिकवण रमजान महिन्यात प्राप्त होते. रमजान हा महिना उपवासाचा महिना ओळखला जातो. मुस्लिमांच्या बारा महिन्यांपैकी रमजान हा एक पवित्र महिना असून मुस्लिम भाविक रोजे धरतात. रोजे म्हणजे उपवास. या काळात विशेष नमाज अदा केली जाते. मुसलमान बांधव सकाळी सूर्योदया पासून उपवास धरतात दिवसभर अन्न- पाणी वर्ज्य, तर सायंकाळी सूर्यास्ताला विशेष नमाज झाल्यावर उपवास सोडला जातो. त्याला इफ्तार म्हणतात. रमजान महिना दया, कृपा, व मंगलकारी महिना असून या महिन्याच्या स्वागतासाठी आणि मंगलकामनेसाठी , गरीब व गरजवंतांना मदत करण्यासाठी समाज बांधव पुढे येतात. रोजा मानवाला सबुरी, थकवा मुक्तीची तालीम देतो व अल्लाहाच्या करीब नेतो असा इमान हाफिज यांचा उपदेश या निमित्ताने राहतो. 

या पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे “रमजान ईद” हा सर्वात मोठा सण, त्योहार, उत्सव यावर्षी शनिवार दि २१ मार्च २०२६ रोजी आहे. अमनचैन म्हणजे सुख शांतीचा संदेश देणाऱ्या शुभेच्छांसह सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाते. रमजान ईदची जय्यत तयारी पूर्णत्वास आली असून तकिया मस्जिदचे इमाम हाफीज अर्कान रजा साहेब यांच्या मार्गदर्शनात रमजान महिन्याचे उपवासाचे योग्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुस्लिम समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!