आपला जिल्हा अकोलाधार्मिक

तेल्हारा येथे गुरुवारपासून संगीतमय श्री शिव महापुराण सदृश कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित.

तेल्हारा येथे गुरुवारपासून संगीतमय श्री शिव महापुराण सदृश कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित.

तेल्हारा येथे गुरुवारपासून संगीतमय श्री शिव महापुराण सदृश कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित.

तेल्हारा, दि. १६(ता.प्र) तेल्हारा शहरातील लोकमान्य चौकात श्री पशुपतिनाथ महादेव मंदिर, आसरा माता मंडळ, तथा गावकरी तेल्हाराच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१९ फेब्रुवारी २०२६पासून संगीतमय श्री शिव महापुराण सदृश्य कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित कार्यक्रम पशुपतिनाथ महादेव मंदिर तेल्हाराच्या प्रथम वर्ष स्थापना दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आला असून व्यासपीठ नेतृत्व सुश्री स्नेहगंगा शृंगारे (आळंदीकर) झी टॉकीज फेम असून सप्ताहातील दैनिक कार्यक्रमात सकाळी ७ ते ९ शिवअभिषेक, दुपारी १ ते ४ शिव महापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७हरिपाठ, रात्री ८ ते १० हरीकिर्तन इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. सप्ताहातील रात्र कालीन हरीकिर्तन करणाऱ्या कीर्तनकारांमध्ये दि. १९ रोजी हभप वैष्णवीताई गावंडे अकोला, २० रोजी हभप प्रमोद महाराज राहणे झाशी पळशी, २१ रोजी हभप विष्णु महाराज गावंडे दर्यापूर, २२ रोजी हभप अर्चना ताई निंबोकारअकोला, २३ रोजी हभप ज्ञानेश्वरी ताई भालतिलक हिवरखेड, २४ रोजी हभप शिवाजी महाराज मानकर दर्यापूर, २५ रोजी हभप कांचनताई पिंपळकार पातुर यांचा समावेश आहे. तर गुरुवार दि. २६ रोजी श्री गुरु भागवत केसरी ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे सकाळी १० वाजता काल्याचे किर्तन होणार आहे.

दुपारी १२ ते ३ महाप्रसाद वितरणाने या मंगल सोहळ्याची सांगता होणार आहे. सदर सप्ताह अंतर्गत बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गावातून भव्यदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्त्री-पुरुष भाविकांनी सप्ताहातील कार्यक्रमात उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!