आपला जिल्हा अकोला

विस्तारित आयुष्यमान भारत योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा. 

रूग्णालयांची नियमित तपासणी व्हावी - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

विस्तारित आयुष्यमान भारत योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा. 

रूग्णालयांची नियमित तपासणी व्हावी – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. 23 : विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सर्वांसाठी पाच लाखांपर्यंत विनामूल्य उपचाराची सुविधा शासनाने दिली आहे. तथापि, अंगीकृत रूग्णालयांबाबत तक्रारी येत आहेत. त्यादृष्टीने अशा रूग्णालयांची नियमित तपासणी करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.

विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, योजनेच्या समन्वयक शीतल गावंडे आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, विविध आजारांवरील शस्त्रक्रिया आदी 5 लक्ष रू. पर्यंतचे उपचार मिळत असल्याने गोरगरीब रूग्णांसाठी ही योजना दिलासा ठरली आहे. तथापि, योजनेत अंगीकृत रूग्णालयांबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा रूग्णालयांची नियमित तपासणी करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करावा. प्रत्येक गरजू रूग्णाला योग्य उपचार मिळाले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले.

गोल्डन कार्ड वितरण व इतर अनुषंगिक विषयांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात योजनेत 44 अंगीकृत रूग्णालये असून, आतापर्यंत 68 हजारहून अधिक रूग्णांनी योजनेत लाभ घेतला आहे, अशी माहिती श्रीमती गावंडे यांनी दिली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!