Uncategorized

ॲटोरिक्षाचालकाच्या मुलाचे MHT -CET परिक्षेत घवघवीत यश.!

संकेत च्या यशाचे सर्वत्र कौतुक.

ॲटोरिक्षाचालकाच्या मुलाचे MHT -CET परिक्षेत घवघवीत यश.!
संकेत च्या यशाचे सर्वत्र कौतुक.

मुळचे बेलखेड, तालुका- तेल्हारा जिल्हा अकोला येथील रहिवासी विजय बोंद्रे यांचा मुलगा संकेत याने नुकत्याच जाहीर झालेल्या MHT CET परिक्षेत ९९.२० पर्सेंटाइल मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

मुळ गाव बेलखेड असलेल्या संकेत चे वडील कामाच्या निमित्ताने पुणे येथे स्थाईक झाले. कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते ॲटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. आर्थीक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण केले. संकेत ने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत MHT CET परिक्षेत ९९.२० पर्सेंटाइल मिळवत त्यांची मेहनत सार्थकी लावली आहे. संकेत बालपणापासून अभ्यासू व मेहनती विद्यार्थी असून त्याने दहावी बोर्ड परिक्षेत ९६.८०% गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला होता.

“मी ॲटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. कुठलाही व्यवसाय लहान -मोठा नसतो हे खरे आहे परंतू आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे अशी इच्छा आहे. संकेत ने मिळवलेल्या यशामुळे समाधान वाटले..” असे मनोगत संकेतचे वडील विजय बोंद्रे यांनी व्यक्त केले.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये यश प्राप्त करता येते हे संकेत ने दाखवून दिले आहे. संकेत च्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून आपल्या यशाचे श्रेय त्यांने आई वडील, शिक्षक तसेच नातेवाईकांना दिले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!