जालना-खामगाव रेल्वेमार्गाचा विस्तार हिवरखेड पर्यंत व्हावा, जुन्या हिवरखेड-जलंब-खामगाव मागणीला उजाळा.,केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे यांनी पुढाकार घेण्याची गरज.
जालना-खामगाव रेल्वेमार्गाचा विस्तार हिवरखेड पर्यंत व्हावा, जुन्या हिवरखेड-जलंब-खामगाव मागणीला उजाळा.,केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे यांनी पुढाकार घेण्याची गरज.
जालना-खामगाव रेल्वेमार्गाचा विस्तार हिवरखेड पर्यंत व्हावा, जुन्या हिवरखेड-जलंब-खामगाव मागणीला उजाळा.,केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे यांनी पुढाकार घेण्याची गरज.

देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत असताना तेल्हारा शहरात अजूनही रेल्वे मार्ग पोहोचलेला नाही. त्यामुळे जालना- खामगाव रेल्वेमार्गाचा विस्तार शेगाव, निंबा, वांगेश्वर, वाडी, तेल्हारा मार्गे हिवरखेड पर्यंत व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे ही मागणी नवीन नसून अनेक वर्षांपूर्वी आबासाहेब खेडकर यांच्या काळात शेतकरी नेते भाई प्रभाकरराव सावरकर यांनी समर्थकांसह ही मागणी रेटून धरली होती. तसा सर्वे सुद्धा झाला होता. जालना खामगाव हा रेल्वे मार्ग विस्तारित झाल्यास तेल्हारा- बाळापुर- शेगाव- संग्रामपूर या तालुक्यांची भविष्यकालीन दशा दिशा बदलणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट- तेल्हारा तालुका, बुलढाणा वाशिम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात रेल्वेचे जाळे अत्यंत कमी आहे. त्यामुळे विविध रेल्वेसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरातून मागण्या होत आहेत. यासाठी मध्य रेल्वे मुंबई चे ZRUCC सदस्य श्याम आकोटकर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, हिवरखेड विकास मंच संयोजक धिरज बजाज, श्री. अग्रसेन भवन समिती हिवरखेड, तेल्हारा विकास मंच, यांच्यासह अनेक जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत. रेल्वे संबंधित विविध मागणीची निवेदने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्ड अध्यक्ष दिल्ली, महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई , महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांचे सह अनेक वरिष्ठांना पाठविण्यात आले आहेत.
*सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे संकेत*
रेल्वे संबंधी मागण्यांचा विषय महत्वाचा असल्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मागणी रेटून धरण्यासाठी हिवरखेड तेल्हारा नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी वर्ग, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपससरपंच, सदस्य, आपापले ठराव, पत्रे देऊन पुढाकार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापरावजी जाधव, सोबतच अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, विविध आमदार यांनी रेल्वे मार्ग विस्ताराचा मुद्दा आणि इतर मागण्या शासनाकडे रेटून धरल्यास गल्ली ते दिल्ली एकच सरकार असल्यामुळे ते सहज शक्य आहे.
*रेल्वे संबंधी प्रमुख मागण्या*
जालना खामगाव प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विस्तार शेगाव, तेल्हारा, मार्गे हिवरखेड पर्यंत करावा.
ह्या 65 किमी वाढीव रेल्वे मार्गासाठी सर्वे मंजूर करून त्या रेल्वेमार्गाचे काम लवकर व्हावे.
अकोट येथून अकोला वाशीम हिंगोली मार्गे मुंबई करिता दररोज धावणारी नवीन मेळघाट एक्सप्रेस सुरू करावी.
अकोट- आम्ला खुर्द- खंडवा आणि खंडवा ते इंदोर चे गेज परिवर्तन लवकर पूर्ण करावे.
महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर प्रस्तावित 7 किमी च्या बोगद्याचे काम सुरू झाले नाही. ते काम तात्काळ पूर्ण करावे.
अकोट-अंजनगाव-अचलपूर चांदूरबाजार या नवीन रेल्वे मार्गाचा सर्वे करून मंजुरात देण्यात यावी.
दिल्ली, काश्मीर सहित महत्त्वपूर्ण गंतव्यस्थानी जाण्यासाठी अकोट येथून अकोला मार्गे दिल्ली, जम्मू दररोज धावणारी नवीन सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी.
नांदेड डीव्हिजनला SCR झोन मधून काढून मध्य रेल्वे CR मध्ये जोडावा.
अकोला आणि अकोट येथून नवीन रेल्वे सूरू होऊ शकेल त्याकरिता अकोला आणि अकोट रेल्वे स्टेशनवर पिट लाईन मंजूर करून पिट लाईनचे निर्माण लवकर केले जावे.
अकोला ते अकोट या मार्गावरील सर्व लुप लाईन ह्या मेन ट्रॅक ला तात्काळ कनेक्ट करण्यात याव्या.
अकोला वरून किंवा अकोला पर्यंत चालणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा विस्तार अकोट पर्यंत करण्यात यावा.
हिवरखेड मोठे शहर असल्याने आणि 50 च्या वर गावे संलग्न असल्याने हिवरखेड येथील रेल्वे स्टेशन मोठे बनविण्यात यावे व तेथे भविष्यात सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा. तसेच हिवरखेड रेल्वे स्टेशन नजीक मालधक्का सुद्धा बनविण्यात यावा
अकोला अकोट खंडवा इंदोर हा मार्ग उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि महत्वपूर्ण मार्ग असल्याने गेज कन्वर्जन करताना अप-डाऊन डबल ट्रॅक सुद्धा टाकला जावा आणि विद्युतीकरणचे कार्य पूर्ण केले जावे.
जालना खामगाव रेल्वे मार्गाचा शेगाव तेल्हारा हिवरखेड पर्यंत विस्तार, नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे, यासह अनेक महत्वाच्या मागण्या आलेल्या असून मध्य रेल्वेची मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक होणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त मागण्या महाप्रबंधकाकडे मांडणार आहे . सोबतच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुपभाऊ धोत्रे आणि सर्व संबंधित आमदार यांनाही विनंती करून मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह करू.- श्याम उर्फ प्रफुल्ल आकोटकर, ZRUCC सदस्य मध्य रेल्वे मुंबई.
जालना खामगाव रेल्वे मार्गाचा विस्तार शेगाव तेल्हारा मार्गे हिवरखेड पर्यंत झाल्यास तेल्हारा शहर व अनेक गावे रेल्वेने जोडल्या जातील. सोबतच अकोट येथून मुंबई, दिल्ली सह विविध शहरासाठी नियमित रेल्वे सेवा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. अकोट हिवरखेड खंडवा इंदोर हा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प तात्काळ पूर्ण व्हावा. व या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण सुद्धा पूर्ण करावे.- धिरज बजाज, अकोला प. जिल्हाध्यक्ष अ. भा. ग्रा. पत्रकार संघ

माझ्या बेलखेड शेत शिवारातील शेता जवळ सर्वेक्षण झालेला दगड बरेच वर्षापासून पाहण्यात होता–माधव अहेरकर, कोठा
चंदनपूर- हिवरखेड- खामगाव ही मागणी शेतकरी नेते स्व. भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या पुढाकाराने या अगोदर झाली आहे. या विषयी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण सुद्धा झाले असल्याचे दगड बेलखेड शेत शिवारात बरेच वर्षापासून होते परंतु पुढे काहीच झाले नाही… मध्यंतरी याबाबत तेल्हारा रेल्वे कृती समिती मार्फत पाठपुरावा झाला होता.
सत्यशील सावरकर, जेष्ठ पत्रकार, तेल्हारा तालुका.