आपला जिल्हा

नगर परिषद तेल्हारा शाळा प्रवेशोत्सव तथा नवागतांचे स्वागत.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप.

नगर परिषद तेल्हारा शाळा प्रवेशोत्सव तथा नवागतांचे स्वागत.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप.

तेल्हारा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानपीठ नगरपरिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये तेल्हारा न.प. मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली नव प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नवप्रवेशोत्सव कार्यक्रमास न .प. चे प्रशासन अधिकारी हिरालाल अग्रवाल, शाळा समितीचे अध्यक्ष गोपाल सोळंके, उपाध्यक्ष नंदिनी पोहरकार, पालक अनिल मेतकर, निवृत्त अध्यापक गुलाबराव मानकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश शिंगणारे,जेष्ठ पत्रकार सत्यशील प्र. सावरकर, मुख्याध्यापक दीपक कोपरे, फातेमा बी शेख इसाक इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


शाळेने पहिलीपासून सीबीएसीई अभ्यासक्रमासह सेमी इंग्लिश वर्ग यावर्षीपासून सुरू केले असून इयत्ता पहिली १९ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला आहे. नवोदित विद्यार्थ्यांचे पुष्प चॉकलेट देऊन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी उन्हाळी सुटी संपल्यानंतर २०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत असल्यामुळे शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, निमंत्रित तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कु प्रीती घोगरे प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक कोपरे यांनी केले .तर आभार नवलकुमार ताले यांनी मानले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!