आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग; बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोठे नुकसान., मदतीची गरज

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग; बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोठे नुकसान., मदतीची गरज

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग; बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोठे नुकसान., मदतीची गरज

तेल्हारा बेलखेड मुख्य रस्त्यावरील शेत शिवार, सर्वे नं. ७९१ येथील शेतकरी अशोक पुंडलिक धुमाळे यांच्या ऊसाच्या शेतात विद्युत तारेमुळे शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली असल्याचे शेतकरी यांनी सांगितले.

या आगीत ऊसाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बोअरचे केबल, स्प्रिंकलर पाईप तसेच सिंचन साहित्य जळून खाक झाले आहे. आगेचे रूद्र रूप पाहून स्थानिक पातळीवर नागरिकांना आग विझविण्याचा प्रयत्न केले परंतु आग वाढत असल्याने तेल्हारा अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली. तेल्हारा नगराध्यक्षा सौ. वैशाली ताई जितेंद्र पालीवाल यांनी तातडीने अग्निशमन पाठविली. अग्निशमन दल तेल्हारा ने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली व शेजारील उर्वरित ऊस पीक वाचवले, त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले असून त्यांच्या तत्पर कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत महसूल व कृषी विभागाकडून मदत व्हावी व विद्युत तारेमुळे आग लागल्याने संबंधित विभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!