आपला जिल्हा अकोला

‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’त गुरुवारी तेल्हारा येथे नागरिकांची भर पावसात भरभरून उपस्थिती.,आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन. 

'छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा'त गुरुवारी तेल्हारा येथे नागरिकांची भर पावसात भरभरून उपस्थिती.,आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन. 

छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’त गुरुवारी तेल्हारा येथे नागरिकांची भर पावसात भरभरून उपस्थिती.,आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन. 

महसूल कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या, रखडलेली प्रकरणे आणि विविध दाखल्यांसाठी होणारी नागरिकांची धावपळ थांबविण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’ला गुरुवारी तेल्हारा येथे नागरिकांनी भर पावसात भरभरून उपस्थिती देवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार सभागृहात महसूलसह विविध विभागांचे अधिकारी थेट नागरिकांसमोर बसल्याने अनेक तक्रारी, अर्ज आणि महसुली प्रकरणांवर काही बाबतीत जागेवरच निर्णय घेण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

शिबिराचे उद्घाटन अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, उपविभागीय अधिकारी (अकोट) मनोज लोणारकर, तहसीलदार (अकोट) सुनील चव्हाण, तहसीलदार (तेल्हारा) महेश रामगुंडे, तेल्हारा- हिवरखेड नगर परिषद मुख्याधिकारी सतीश गावंडे, नगराध्यक्षा सौ वैशाली पालीवाल,अकोट नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे, तेल्हारा उपाध्यक्ष सचिन तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, पंचायत राज, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, महावितरण, नगर परिषद आदी विभागांचे स्वतंत्र सेवा कक्ष उभारण्यात आले होते. उत्पन्न, जात, निवासी दाखले, वारस नोंदी, फेरफार, महसुली प्रकरणे, विविध शासकीय योजनांचे अर्ज आणि प्रमाणपत्रांबाबत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या तक्रार सोडवण्यासाठी दिल्या. शिबीरात अनेक प्रकरणांवर तातडीने काही प्रकरणात कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना लाभवितरण, प्रमाणपत्र, दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी गावागावात जनजागृती च्या उद्देशाचे व शिबीराचे महत्त्व सांगितले. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील चव्हाण आणि तहसीलदार महेश रामगुंडे यांनी नागरिकांनी अशा शिबिरांचा अधिकाधिक लाभ घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

एका छताखाली मिळाल्या ‘या’ सेवा –

• उत्पन्न, जात व निवासी दाखले

• वारस नोंद व फेरफार प्रकरणे

• महसुली तक्रारींची सुनावणी

• विविध शासकीय योजनांचे अर्ज व मार्गदर्शन

• पात्र लाभार्थ्यांना लाभवितरण

• विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!