तेल्हारा येथे 26 जुलै कारगिल विजय दिवसी आजी माजी सैनिक परिवाराकडून वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान.
तेल्हारा येथे 26 जुलै कारगिल विजय दिवसी आजी माजी सैनिक परिवाराकडून वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान.
तेल्हारा येथे 26 जुलै कारगिल विजय दिवसी आजी माजी सैनिक परिवाराकडून वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान.

तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे वतीने दरवर्षी प्रमाणे 26 जुलै कारगिल विजय दिवसी आजी माजी सैनिक परिवाराकडून वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शासकीय विश्राम गृह पासून शहीद परिवार यांना विशेष स्थान देऊन सैनिक मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये आजी माजी सैनिक व परिवार, विद्यार्थी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास व टॉवर चौक मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वीर माता व वीर पत्नी यांच्या कडून हार अर्पण करण्यात आले , पुढे रॅली श्री साई बाबा मंदिर मंगल कार्यालय पर्यंत काढण्यात आली यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.

मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंचावर शहीद , वीर चक्र विजेते प्रविण जंजाळ यांच्या वीर माता सौ शालूताई प्रभाकर जंजाळ, चिखली येथील वीर पत्नी कविता किशोर पारवे वीर पुत्रि खुशी व सई ,नगराध्यक्षा सौ वैशाली पालीवाल, नायब तहसीलदार विकास राणे, डॉ बोडखे उपस्थित होते, यावेळी भारत मातेच्या प्रतिमेला पूजन करून व कारगिल शहीद वीर व भूमिपुत्र शहीद वीर यांना सामूहिक श्रध्दांजली देण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली, आजी माजी सैनिक परिवाराकडून वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार विकास राणे, नगर सेविका सौ मोनिका वाघ, सौ योगिता राम पाऊलझगडे , कु. मेंढरे यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच कु. दुगाने , कु दातकर , यांनी देशभक्तिपर गीत गाईले,दरम्यान गतवर्षी सेवा निवृत्त माजी सैनिक यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर यांनी तर आभार प्रदर्शन माजी सैनिक दिनेश माकोडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतने करण्यात आली .