जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना गावपातळीवर निर्माण होणार गोदामे कार्यवाहीला गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला, दि. १२ : सहकार व महसूल विभागामार्फत ‘गाव तिथे गोदाम’ आणि ‘जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना’ अंतर्गत प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना गावपातळीवर गोदाम बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संस्थांचे प्रस्ताव, जागेचा शोध व इतर कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सहकार विकास समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा उपनिबंधक हितेशचंद्र साबळे, उपजिल्हाधिकारी निखील खेमनार, अभय कटके व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना व ‘गाव तिथे गोदाम’ उपक्रमाद्वारे गावातच सुरक्षित धान्य साठवणूक व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी सहकार विभागाने संस्थांचे प्राप्त प्रस्ताव तपासून अचूक व परिपूर्ण माहिती सादर करावी. तहसील कार्यालयाशी समन्वय ठेवून कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गोदाम योजनेसाठी सध्या ६७ संस्थांचे प्रस्ताव प्राप्त असल्याचे श्री. कटके यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत अपात्र व्यक्तींचा शोध घेऊन यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय सहकारी डेटाबेस अद्ययावतीकरण व इतर विषयांवरही चर्चा झाली.