बेलखेड येथे तेजस्विनी आर्य वीरांगना शिबीर फक्त मुलीं करिता 25 मे ते 2 जून पर्यंत.,आर्य समाज बेलखेड चे आयोजन.
बेलखेड येथे तेजस्विनी आर्य वीरांगना शिबीर फक्त मुलीं करिता 25 मे ते 2 जून पर्यंत.,आर्य समाज बेलखेड चे आयोजन.
बेलखेड येथे तेजस्विनी आर्य वीरांगना शिबीर फक्त मुलीं करिता 25 मे ते 2 जून पर्यंत.,आर्य समाज बेलखेड चे आयोजन.

शारीरिक, आत्मिक, वैचारिक, शैक्षणिक उन्नती करिता प्रतीभा संपन्न आचार्य, मार्गदर्शन व प्रशिक्षकांच्या सानिध्यात बेलखेड येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात तेजस्विनी आर्य विरांगना शिबिर (फक्त मुलीं करिता) -2026 SUMMER CAMP FOR GIRLS EMPOWERMENT-2026 चे आयोजन सोमवार दि.२५ मे २०२६ ते मंगळवार दि.०२/०६/२०२६ पर्यंत आयोजित केले आहे या शिबीरात दाखल होवू इच्छितांच्या पालकांनी नोंदणी करून घेण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.

आर्य समाज, बेलखेड, आर्य समाज, माळेगांव बाजार, श्री संत गजानन महाराज मंदिर, बेलखेड व संस्कृती सर्वधन संघ हिवरखेड, महर्षि दयानंद सरस्वती इंग्लिश स्कुल, बेलखेड, साध्वी चंफा माता ज्ञानपीठ, माळेगांव बा. यांचे सहकार्याने होत असलेल्या शिबिरामध्ये योगासन, प्राणायम लाठीकाठी, लेझीम, डंबेल्स सर्वांग सुंदर व्यायाम स्वयं सुरक्षा, स्वावलंबन आदी सहअग्रिहोत्र, ईश्वर प्रार्थना -पंच महायज्ञ, आत्मनिरिक्षण व्यवहार कुशलता वैदिक चिंतन तसेच राष्ट्रीय एवं सामाजिक ऋण, दायित्व, योगदान, देशभक्ती गीत गायना बरोबरच मित्रता व संगती चा प्रभाव आदी विविध विषयांवर विविध स्तरावरील मान्यवर, मार्गदर्शकांचे उदबोधन, मार्गदर्शन होणार आहे.
आवेदन पत्र व विस्तृत माहिती करीता सौ. पद्मावतीताई सुरेशराव कोल्हे, सौ. निशाताई नवल टावरी, सौ. वर्षा शांतीलाल गोमासे, गजानन सुखदेव नागपुरे, अॅड. सुधाकर खुमकर, अरुणराव टोहरे, लक्ष्मण लोळे, गजानन सुखदेव नागपुरे, राजु अढाऊ, सत्यदेव गावंडे माळेगाव, नंदकिशोर निमकर्डे, राजेश हरिभाऊ गोमासे, नवल टावरी, गजानन किसन वसे, डॉ. दिपक येनकर, विलास आप्पा साखरे, सुरेश अरुडकार, अनिल उंबरकार, रमेशभाऊ, गोपाल टोहरे, अरविंद गि-हे सर, हर्षल येनकर, रविंद्र गि-हे, पंकज राठी, चंद्रशेखर बोहरा, विनय राठी, राजु इंगळे, काशिराम अढाऊ, गोपाल दाते, दिपक नागपुरे, प्रदीप राऊत, सत्यशील प्र सावरकर, गणेश सोनटक्के, योगेश कुयटे, विशाल मलीये, विक्की खुमकर, निलेश खुमकर सोबत संपर्क साधवा अशी माहिती आर्य समाज बेलखेड चे शांतीलाल गोमासे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.