दिवाळीपूर्वी पालकांचे हाती देणार वरवधू परिचय पुस्तिका., श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत कार्यरत मध्यस्थी मंडळ अकोट ने केला वार्षिक नियोजनात बदल.
दिवाळीपूर्वी पालकांचे हाती देणार वरवधू परिचय पुस्तिका., श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत कार्यरत मध्यस्थी मंडळ अकोट ने केला वार्षिक नियोजनात बदल.
दिवाळीपूर्वी पालकांचे हाती देणार वरवधू परिचय पुस्तिका., श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत कार्यरत मध्यस्थी मंडळ अकोट ने केला वार्षिक नियोजनात बदल.

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेअंतर्गत कार्यरत मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ अकोट द्वारा विवाह इच्छुक मुला मुलींचे विवाह जुळून आणण्यासाठी पालकांना विवाह विषयक उपक्रम व सुविधा वेळेत मिळाव्यात या करिता मंडळाच्या वार्षिक नियोजनात मोठे बदल केले आहेत. या बाबत नुकत्याच झालेल्या मध्यस्थी मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

गत १४वर्षात मध्यस्थी मंडळाने आपल्या निष्काम सेवा कार्यातून राज्यभरात लौकिक प्राप्त केला आहे. पुणे अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा विभागीय शाखा व जिल्हा व तालुका शाखा व मध्यस्थीचे समन्वयकांचे नेटवर्क निर्माण केले. या माध्यमातून पालक संपर्क, वधूवर परिचय मेळावे करुन मुला मुलींची नोंदणी करण्यात येते. उच्य शिक्षित, नोकरी व जॉब करणारे, व्यापारी, व्यवसायी व उद्योजकांसह ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील मुला मुलींची नोंदणी केली जाते. सर्वस्तरीय मुला मुलींचे परिचय पत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात.
अक्षय तृतीयेला नोंदणीस प्रारंभ –
वार्षिक नियोजनानुसार सन २०२६-२७ वर्षांची उपवर मुला मुलींच्या नोंदणीस अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर समारंभपूर्वक प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून आपल्या मुला मुलींची मंडळाकडे रितसर नोंदणी केली आहे. ही नोंदणी जुलै अखेरपर्यंत करता येणार आहे..
मध्यस्थीचे विविध उपक्रमात सहभागी व्हावे !
मुला मुलींचे विवाह योग जुळून आणण्यासाठी मध्यस्थी मंडळ विविध उपक्रम राबवित आहे. राज्यभरातील डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, शासकीय. निम शासकीय व खासगी नोकरी व जॉब करणारे, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक तथा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसह सर्व स्तरातील मुलांची नोंदणी करणे, विभागीय व जिल्हा स्तरावर परिचय मेळावे आयोजित करणे, वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन, दर रविवारी साप्ताहिक सोयरिक बैठकीचे आयोजन, आदर्श विवाह केंद्राचे संचालन, पालक संपर्क अभियान, अनिष्ट चालीरीती. वाईट प्रथा, अनावश्यक खर्च टाळून करण्याच्या विवाह आचारसंहिता व समाज प्रबोधनाचे कार्यक्रमामध्ये पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे व मंडळ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क –
मध्यस्थी मंडळाकडे उपवर मुला मुलींची नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी मध्यस्थी कार्यालय, श्रद्धासागर आकोट येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे मंडळाने आवाहन केले आहे. ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणी करिता मोबाईल क्रमांक – 9822212348,,976744537 4,, 90755 38276 वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.