आपला जिल्हा अकोला

तेल्हारा येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

शहरातून काढण्यात आली भव्य मोटरसायकल रॅली. 

तेल्हारा येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

शहरातून काढण्यात आली भव्य मोटरसायकल रॅली.

      दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अखिल भारतीय माळी महासंघ तालुका तेल्हारा कडून महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती भव्य मोटार सायकल रॅली काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोटार सायकल रॅलीची सुरुवात महात्मा फुले चौक येथून करण्यात आली.नंतर महामानव बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना तर टावर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना हार्रापण व अभिवादन करण्यात आले. रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने पुरुष-महिला सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ट्रॅक्टर वर महात्मा फुले यांचे तैलचित्र, मधुर वाद्य, पिवळे फेटे व पिवळ्या परिधान केलेल्या साड्यामध्ये महिला भगिनी रॅलीची शोभा वाढवत होत्या. शिस्तबद्ध रॅली व महात्मा फुले यांच्या नावाचा जयघोष करीत संपूर्ण शहरातून मार्गस्थ होत शेवटी भागवत मंगल कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

     भागवत मंगल कार्यालय येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अकोलाच्या मा.अध्यक्षा सौ.संगीताताई अढाऊ तर प्रमुख अतिथी म्हणून को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनियुक्त संचालक संदीपदादा खारोडे,न.प. हिवरखेडचे स्वीकृत सदस्य श्यामशील भोपळे, मा‌.आमदार बळीराम शिरस्कार,मनब्दा येथील मा. सरपंच गोपाल राऊत,पाथर्डीचे माजी सरपंच प्रकाशभाऊ उगले, वधू-वर परिचय मेळाव्याचे मा.अध्यक्ष शंकरराव गि-हे,अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड.श्रीकांत तायडे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गजानन वानखडे,ग्रा.पं. बेलखेडचे उपसरपंच नंदकिशोर निमकर्डे, प्रकाश वाकोडे,पं.स.सदस्य अरविंद उमाळे, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ शामस्कार,जीवन बोदडे, विनोद पोहरकार,से.नि. मु.अ.वासुदेवराव देऊळकार,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे जिल्हा अध्यक्ष गजानन म्हैसने,समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सुभाष भड,विनोद मिरगे,श्रीराम पालकर, शिक्षक नेते शत्रुघ्न बिरकड, काँग्रेस सेलचे प्रकाश भाऊ तायडे, श्याम जींदे,प्राचार्य अरविंद गि-हे,मा केंद्रप्रमुख प्रकाश राऊत,ॲड.संदीप देशमुख साहेब,माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष हरिदास भोपळे,न.प.तेल्हाराच्या नवनियुक्त नगरसेविका सौ.पंचफुलाताई कवंर, खंडाळाच्या माजी सरपंच सौ.सिंधुताई वानखडे, आदर्श शिक्षिका सौ.प्रमिलाताई वानखडे,सौ.साधनाताई भोपळे, ॲड. प्रीतीताई तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाला तालुक्यातील प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.लखन बगाडे,मनीष राहाटे, पुरुषोत्तम इंगळे, अनिल घोगले,मनीष भुडके,गजानन भोपळे, राजु उमाळे,स्वप्निल इंगळे, निलेश उमाळे,वैभव सोनोने, नरेश सुईवाल,ओमप्रकाश उगले,ओमप्रकाश वेरूळकार आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थिती होते.

     यावेळी सौ.संगीताताई अढाऊ, शत्रुघ्न बिरकड सौ. प्रमिलाताई वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

   कार्यक्रमाचे बहारदार संचालन सचिन ठोमरे सर, प्रास्ताविक ॲड.श्रीकांत तायडे साहेब तर आभार प्रदर्शन प्रशांत खाडे यांनी केले. शेवटी भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी महासंघाचे पदाधिकारी,सदस्य यांनी परिश्रम घेतले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!