सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ यशाचे मानकरी तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गांडेगाव., सरपंच शिलाताई प्रमोदराव वाकोडे यांनी स्विकारला पुरस्कार.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित "मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा" राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ यशाचे मानकरी तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गांडेगाव., सरपंच शिलाताई प्रमोदराव वाकोडे यांनी स्विकारला पुरस्कार.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ यशाचे मानकरी तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गांडेगाव., सरपंच शिलाताई प्रमोदराव वाकोडे यांनी स्विकारला पुरस्कार.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्याऱ्या व्यक्ती/ संस्थेला दिला जातो या वर्षी तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गांडेगाव ला हा पुरस्कार छानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सरपंच शिलाताई प्रमोदराव वाकोडे यांनी स्विकारला आहे.

ग्रामपंचायत गांडेगाव यांनी गावातील विविध विकासाच्या योजना कार्यान्वित केल्या, पाणी फाउंडेशन, सह शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभागी झाले व सरपंच व कार्यकारिणी यांनी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सततची धडपड पाहता या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत गांडेगाव आपली राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे सांगितले आहे.

सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे साहेब यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादवराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा रविवार दि.०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे संपन्न झाला.

यामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत गांडेगाव चे सरपंच शिलाताई प्रमोदराव वाकोडे व उपसरपंच,सदस्य यांनी यावर्षी चा मानाचा गौरव पुरस्कार स्विकारला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यासह तालुक्यातील सरपंच,शेतकरी, उद्योजकांनी, राजकीय पदाधिकारी यांनी गांडेगाव सरपंच शिलाताई प्रमोदराव वाकोडे यांचे स्वागत व अभिनंदन केले.
