आपला जिल्हा अकोलाधार्मिक

गुढीपाडव्याच्या दिवशी घरावर भगवा ध्वज उभारून छत्रपती संभाजी राजांना अभिवादन करा – राजेश पाटील खारोडे

गुढीपाडव्याच्या दिवशी घरावर भगवा ध्वज उभारून छत्रपती संभाजी राजांना अभिवादन करा – राजेश पाटील खारोडे

गुढीपाडव्याच्या दिवशी घरावर भगवा ध्वज उभारून छत्रपती संभाजी राजांना अभिवादन करा – राजेश पाटील खारोडे

तेल्हारा : मराठी नववर्षाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने इतिहासाची जाणीव ठेवत छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाला अभिवादन करावे, असे आवाहन छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात राजेश पाटील खारोडे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुढीपाडवा साजरा करताना उलटा तांब्या व साडी ची गुढी उभारणे म्हणजे मराठ्यांच्या स्वाभिमानाची अब्रू लटकवण्यासारखे आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या मावळ्यांनी त्या दिवशी आपल्या घरावर भगवा ध्वज उभारून स्वराज्याला आणि छत्रपती संभाजी राजांना अभिवादन करावे.

छत्रपती संभाजी राजांनी धर्म, संस्कृती आणि स्वराज्यासाठी अतोनात वेदना सहन करत बलिदान दिले. त्यामुळे गुढीपाडव्याचा दिवस हा त्यांच्या त्यागाची आणि त्यांना झालेल्या वेदनांची आठवण ठेवण्याचा दिवस असल्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे. समाजात भेद निर्माण करणारे ‘शूद्र’ व ‘गरीब’ असे शब्द नष्ट करून स्वाभिमान व एकतेचा संदेश देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरावर भगवा झेंडा उभारून छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा करावा, असे आवाहन राजेश पाटील खारोडे यांनी केले आहे.

छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान, तेल्हारा तालुक्याच्या वतीने छत्रपती संभाजी राजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!