तेल्हारा पालिका अध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या पुढाकाराने प्रभाग १ मध्ये कचरा कुंडीचे वाटप.
तेल्हारा पालिका अध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या पुढाकाराने प्रभाग १ मध्ये कचरा कुंडीचे वाटप.
तेल्हारा पालिका अध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या पुढाकाराने प्रभाग १ मध्ये कचरा कुंडीचे वाटप.

तेल्हारा दि :- तेल्हारा नगरपरिषदेतर्फे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांना कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. नगरपरिषद अध्यक्षा वैशाली जितेंद्र पालिवाल व मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या पुढाकाराने व त्यांनी केलेल्या तरतुदी मुळे ही योजना राबविण्यात आली असून नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर टाकू नये आणि स्वच्छता राखावी हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील महिलांना हिरव्या रंगाच्या कचरा कुंड्या देण्यात आल्या. घरोघरी कचरा संकलन सुलभ व्हावे, ओला व सुका कचरा वेगळा करावा तसेच परिसर स्वच्छ राहावा यासाठी नगरपरिषद प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या वेळी सर्वप्रथम वैशाली पालिवाल नगराध्यक्षा यांचा सत्कार व सन्मान प्रभागाच्या वतीने नगरसेविका कान्होपात्रा फाटकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर कचराकुंड्यांचे वाटप नगरपरिषदेच्या अध्यक्षा वैशाली पालिवाल व नगरसेविका कान्होपात्रा फाटकर यांच्या हस्ते करण्यात आले आयोजित कार्यक्रमाला जितेंद्र पालिवाल, भारत सोनटक्के ,साहेबराव देशमुख, अमोल अकोटकार ,तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर तसेच प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले.
या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.