आपला जिल्हा अकोलाधार्मिक

तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये रमजाननिमित्त इफ्तार पार्टी उत्साहात.,नगरसेवकांचा सामाजिक ऐक्याचा संदेश. 

तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये रमजाननिमित्त इफ्तार पार्टी उत्साहात.,नगरसेवकांचा सामाजिक ऐक्याचा संदेश. 

तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये रमजाननिमित्त इफ्तार पार्टी उत्साहात.,नगरसेवकांचा सामाजिक ऐक्याचा संदेश.

तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित इफ्तार पार्टी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा सुंदर संदेश देण्यात आला. हा कार्यक्रम प्रभाग ९ चे भाजपा नगरसेवक गजानन गायकवाड व प्रवीण ढोके यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला होता.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करून संध्याकाळी नमाजानंतर रोजा सोडतात. या पार्श्वभूमीवर रोजेधारकांसाठी विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंदिरा नगर येथील जामा मशीद तसेच भारत नगर येथील मदीना मशीद येथील रोजेधारक आणि इमाम उपस्थित होते. संध्याकाळची नमाज अदा झाल्यानंतर सर्व रोजेधारक आणि एकता मंडळाचे कार्यकर्ते अण्णा भाऊ साठे समाज मंदिर येथे एकत्र जमले. येथे फळे, फराळ, ड्रायफ्रूट आदींची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करून रोजा सोडला आणि रमजानच्या पवित्र वातावरणात बंधुभावाचे दर्शन घडले.

या वेळी नगरसेवक गजानन गायकवाड, प्रवीण ढोके, अशोक गव्हाळे यांच्यासह एकता मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला.या उपक्रमाबद्दल मुस्लिम बांधवांनी नगरसेवकांचे आभार मानत अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. तेल्हारा शहरात विविध सण-उत्सव एकत्र साजरे करण्याची परंपरा असून या इफ्तार पार्टीने त्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा दिला.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!