छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी पासून सुरू., आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते उद्घाटन.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी पासून सुरू., आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते उद्घाटन.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी पासून सुरू., आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते उद्घाटन.

महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी महसूल मंडळात महसूल व विविध शासकीय सेवांचा लाभ देणारे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराची सुरुवात शनिवार (दि. ७) रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. समाधान शिबीराचे उदघाटन अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. व तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे नोडल अधिकारी म्हणून उपस्थित होते.

पाथर्डी येथील निळकंठ सपकाळ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला तहसीलदार महेश रामगुंडे, बीडीओ अशोक बांगर, पाथर्डी सरपंच सौ. प्रतिक्षा डामरे,निळकंठ सपकाळ विद्यालय मुख्याध्यापक नंदकिशोर मेतकर,तहसील कार्यालयातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, बीएलओ तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराचा लाभ पाथर्डी महसूल मंडळातील सुमारे १३ गावांतील नागरिकांनी घेतला. शिबिरात विविध दाखले वितरण, फेरफार प्रकरणे, घरकुल प्रमाणपत्रे, आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड तसेच पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्या.सकाळी १० वाजता सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.

या दरम्यान तहसीलदार महेश रामगुंडे यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ कसा घ्यावा या बद्दल माहिती दिली व पाथर्डी येथे 7 मार्चला चांगले परिणाम कारक शिबीर संपन्न झाले तशाच प्रकारे –
पुढील सर्कल निहाय शिबीर पंचगव्हाण 14 मार्चला नायब तहसीलदार रेखा किर्तीवार, माळेगाव 10 एप्रिल ला ज्योती नारगुंडी, अडगाव बु 17 एप्रिल ला संजय ढगे, हिवरखेड 8 मे ला विकास राणे, तेल्हारा 15 मे ला विकास राणे या प्रमाणे एक दिवसीय समाधान शिबीराचे महसूल मंडळ स्तरावर होणार आहेत तसेच नगर परिषद नगर पंचायत स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन तसेच तळागाळातील लोकांपर्यंत विविध योजना पोहचवण्यासाठी तेल्हारा तालुक्या मध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहेत त्यांचा सुद्धा तालुक्यातील प्रत्येक मंडळातील ग्रामस्थांनी आप आपल्या दिलेल्या तारखांना मंडळ निहाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.