बोधाच्या समानतेत वयाची गौणता असते – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्रीसंत वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य.
बोधाच्या समानतेत वयाची गौणता असते - श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्रीसंत वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य.
- बोधाच्या समानतेत वयाची गौणता असते – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्रीसंत वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य.

अपवाद हा जरी नियम नसला तरी , नियमाला अपवाद मात्र असतात . किंबहुना अपवाद नियमाला मोडून काढीत नाहीत तर , तो नियम किती व्यापक आहे हे दर्शवून नियमालाच पुष्टी देत असतो. तद्वत उपदेश हा बहुदा भगवद्विमुख संसारासक्त अशा अज्ञान्यांना केल्या जात असतो असा सर्वसामान्य नियम आहे. तसेच तो वरिष्ठांनी कनिष्ठांना अर्थातच मोठ्याने लहानांना करायचा असतो. परंतु तत्त्वज्ञानाच्या बाबतीत बोधाच्या समानतेत वयाची गौणता असते असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्रीसंत वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित असणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण तथा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रथम पुष्प गुंफीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भगवान श्री ज्ञानोबारायांचे श्रीगुरु संतश्री निवृत्तीनाथ हे असून , आदिशक्ती मुक्ताई ह्या ताटी लावून बसलेल्या माऊलींना जबाबदारीचे ओझे खांद्यावर आल्यानंतर रुसायचे , थकायचे, थांबायचे व चुकायचे नसते अशी प्रेरणा ताटीच्या अभंगांच्या माध्यमातून देतांना दिसून येतात. अर्थातच बोधाची समानता असेल तर, वयाच्या विचाराला गौणत्व दिल्या जाते. किंबहुना वैदिक परंपरेमध्ये तत्त्वपदेशाकरिता नात्यांच्या व वयाच्या नियमाला शिथिलता देण्यात आलेली असल्याचे त्यांनी यावेळी अनेक पौराणिक दाखले देऊन उपस्थितांना पटवून दिले. वास्तविक पाहता वडिलांनी मुलांना उपदेश करायला पाहिजे परंतु पद्मपुराणअंतर्गत श्रीमद्भागवत महात्म्यामध्ये गोकर्ण नामक मुलगा आत्मदेव नावाच्या पित्याला उपदेश करतो. तसेच कपिल मुनी हे देवाहूतिला म्हणजेच स्वतःच्या आईला उपदेश करतांना दिसून येतात. एवढेच नाही तर चुडाला नावाची महाराणी शिखिध्वज नामक राजाला म्हणजेच स्वतःच्या पतीला उपदेश करते. त्याचप्रमाणे वयाने लहान असणाऱ्या मुक्ताईने योगी चांगदेव , ज्ञानी ज्ञानदेव व भगवद्प्रेमी नामदेवांना प्रेरणा देऊन वारकरी संप्रदायाला हे त्रिदेव प्रदान केले. असे सप्रमाण चिंतन त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या समोर मांडल्याचे भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.