राज्यस्तरीय व विभागस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार परिक्षण समिती जाहीर.
अकोला लोकमत चे रवि टाले सह विविध माध्यमातील संपादकाचा समितीत समावेश.
राज्यस्तरीय व विभागस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार परिक्षण समिती जाहीर.,अकोला लोकमत चे रवि टाले सह विविध माध्यमातील संपादकाचा समितीत समावेश.

राज्यातील सर्व जिल्ह्यामधून शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यस्तरीय व विभागस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन २०२०, २०२१, २०२२ व २०२३ करीता प्रवेशिका मागविण्यात आल्या असून या प्रवेशिकांचे परिक्षण करुन त्यामधून पात्र ठरणाऱ्या तीन वर्षांसाठीच्या विजेत्यांची निवड करण्याकरीता तसेच, सन २०२४ या वर्षाकरीता जानेवारी, २०२४ मध्ये मागविल्या जाणाऱ्या प्राप्त प्रवेशिकांचे परिक्षण करुन पात्र विजेत्यांची निवड करण्याकरीता परिक्षण समिती गठित करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई हे अध्यक्ष तर मंदार पारकर, नवराष्ट्र, मुंबई अशासकीय सदस्य, रमेश कुळकर्णी (पुण्यनगरी) अशासकीय सदस्य, रवि टाले (लोकमत अकोला) अशासकीय सदस्य,दिलीप सपाटे (पुढारी मुंबई) अशासकीय सदस्य,योगेश नाईक (हिंदुस्तान टाईम्स मुंबई) अशासकीय सदस्य,कमलेश सुतार (झी २४ तास, मुंबई)अशासकीय सदस्य,वृशाली कदम (जय महाराष्ट्र मुंबई)अशासकीय सदस्य,विकास वैद्य (हितवाद नागपूर) अशासकीय सदस्य,रणजितसिंग (एएनआय, मुंबई) अशासकीय सदस्य,अजीज एजाज(उर्दू टाईम्स, मुंबई) अशासकीय सदस्य तसेच संचालक (माहिती) (वृत्त व जनसपंर्क) माहिती व जनसंपर्क महासंचानालय, मुंबई सदस्य सचिव राहतील.
सदर समितीमधील अशासकीय सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी वित्त विभागाच्या शासन निर्णय तरतूदीनुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील मात्र सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार त्यांना विमान प्रवास व रेल्वेच्या वातानुकुलीत प्रथम वर्गाचा प्रवास अनुज्ञेय राहणार नाही.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढण्यात आला आहे.